SBI कडून दरमहा 60,000 रुपये कमावण्याची संधी; कसं ते जाणून घ्या

SBIची ATM फ्रँचायझी घेऊन चांगली कमाई करू शकता.
SBI ATM Franchise
SBI ATM Franchiseesakal
Updated on

तुम्हाला घरी बसून व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यामध्ये तुम्ही दरमहा किमान 60,000 रुपये कमवू शकता. ही संधी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देत आहे. तर गोष्ट अशी आहे की तुम्ही SBI ATM फ्रँचायझी घेऊन चांगली कमाई करू शकता. बँक एटीएमसाठी फ्रँचायझीचा वापर करते.

फ्रँचायझीच्या अटी-
तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुमच्याकडे किमान 50-80 चौरस फूट जागा असली पाहिजे. ही जागा इतर ATM पासून 100 मीटर अंतरावर असले पाहिजे. ही जागा दुरुनही दिसू शकेल अशी असावी. 24 तास वीजपुरवठा असावा, याशिवाय 1 किलोवॅट वीज कनेक्‍शन असावे लागेल. या एटीएमची क्षमता दररोज 300 ट्रान्झॅक्शनची असावी. V-SAT बसवण्यासाठी सोसायटी किंवा अथॉरिटीचे ना हरकत प्रमाणपत्र असणे (NOC) आवश्यक आहे.

'ही' लागतील कागदपत्रे-
ओळखपत्रासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबतच पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशनकार्ड किंवा वीज बिल असणे आवश्यक आहे. बँक खाते आणि पासबुकही गरजेचे आहे. फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर द्यावा लागेल. GST क्रमांकही लागेल. (SBI ATM Franchise, Opportunity to earn Rs. 60,000 per month)

SBI ATM Franchise
फेसबुकवर रील्स बनवा, महिन्याला कमवा 26 लाख रुपये, कसे ते वाचा?

अर्ज कसा करायचा?
काही कंपन्या SBI ATM च्या फ्रँचायझी देतात. तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांच्याकडे भारतात एटीएम बसवण्याचे कान्ट्रॅक्ट आहे. यासाठी तुम्ही या सर्व कंपन्यांच्या वेबसाइटवर ऑनलाइन लॉग इन करून तुमच्या एटीएमसाठी अर्ज करू शकता.

ऑफिशियल वेबसाइट
Tata Indicash – www.indicash.co.in
Muthoot ATM – www.muthootatm.com/suggest-atm.html
India One ATM – india1atm.in/rent-your-space

SBI ATM Franchise
सामान्यांचं कंबरडं मोडणाऱ्या कोरोनाने IT कंपन्यांना केलं मालामाल

किती खर्च येईल?
यातील टाटा इंडिकॅश ही सर्वात मोठी आणि जुनी कंपनी आहे. यामध्ये 2 लाख सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यावर फ्रँचायझी मिळते. जे रिफंडेबल आहे. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटल म्हणून जमा करावे लागतील. अशा प्रकारे एकूण 5 लाख रुपये भरावे लागणार आहेत.

किती कमाई होईल?
तुम्हाला प्रत्येक रोख व्यवहारावर 8 रुपये आणि नॉन-कॅश व्यवहारावर 2 रुपये मिळतात. गुंतवणुकीवरील रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट 33-50% पर्यंत असतो. समजा तुमच्या ATM मधून दररोज 250 व्यवहार होत असतील, ज्यामध्ये 65 टक्के रोख व्यवहार आणि 35 टक्के नॉन-कॅश ट्रान्झॅक्शन असेल, तर मासिक उत्पन्न 45 हजार रुपयांच्या जवळपास असेल. त्याच वेळी, दररोज 500 व्यवहार झाल्यास सुमारे 88-90 हजार कमिशन मिळेल.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.