SBIची मोठी घोषणा; घरबसल्या घ्या ८ सेवांचा फायदा

SBI
SBI
Updated on

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (SBI) इंटरनेट बँकिंग पोर्टलद्वारे ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवते. या सेवेमध्ये एसबीआय ग्राहक आपल्या खात्यामधील शिल्लक रक्कम तपासू शकतात, निधी हस्तांतरित करू शकतात, नवीन चेकबुकसाठी विनंती करू शकतात आणि डेबिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. या सेवांशिवाय ग्राहकांना एसबीआयमध्ये इंटरनेट बँकिंगद्वारे मुदत ठेवी (Fixed Deposite) आणि आवर्ती ठेव खाते तयार करण्याची सुविधा देखील मिळते. इंटरनेट बँकिंग वापरण्यासाठी यूजरनेम आणि लॉग-इन पासवर्डची आवश्यकता असते. 

एसबीआय इंटरनेट बँकिंग सुविधा आपल्याला घरबसल्या सुरक्षित सुविधेसह बँकिंग व्यवहार करण्यासाठी परवानगी देते. या सेवेद्वारे तुम्ही कुठूनही आणि कधीही व्यवहार करू शकता.

घरबसल्या करा ही कामे - 
एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट केले आहे, जे ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे. ग्राहक घरबसल्या इंटरनेट बँकिंगद्वारे आठ प्रकारची कामे करू शकतात.

पैशांचे व्यवहार, एटीएम कार्डसाठी अर्ज, ठेवी (Deposite) खात्याशी संबंधित कामे, बिल पेमेंट, बचत खात्याचे स्टेटमेंट, चेक बुकसाठी अर्ज करणे, युपीआय सुरू करणे आणि बंद करणे, कर भरणे.

असं सुरू करा इंटरनेट बँकिंग
यापूर्वी खातेदारांना नेटबँकिंग सुविधेसाठी बँकेत हेलपाटे मारावे लागत होते. त्यासाठी एक फॉर्म भरावा लागत होता. सुविधा सुरू करण्यासाठी प्रि-प्रिंट केलेल्या सूचना किटसाठी थांबावे लागत असे. पण आता बँकेत हेलपाटे मारण्यापासून तुमची सुटका होणार आहे. तुम्ही घरी बसून एसबीआयच्या नेटबँकिंग सुविधेसाठी नोंदणी करू शकता. हे काम पूर्णपणे ऑनलाइन करता येते. 

- पहिल्यांदा एसबीआयच्या नेट बँकिंग onlinesbi.com या होमपेजवर जा. 
- त्यानंतर New User Registration/Activation वर क्लिक करा.
- खाते क्रमांक, सीआयएफ क्रमांक, शाखा क्रमांक, देश, नोंदणी केलेला मोबाइल क्रमांक, आवश्यक माहिती भरा आणि Submit या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP येईल. 
- आता एटीएम कार्ड पर्याय निवडा आणि जर तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तर बँक पुढील प्रक्रिया पूर्ण करेल. 
- तात्पुरते यूजरनेम आणि पासवर्ड तयार करा. (पासवर्डमध्ये आठ शब्दांसह विशेष शब्दाचा वापर करा). पासवर्ड पुन्हा एकदा प्रविष्ट करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी Submit या बटणावर क्लिक करा.
- तात्पुरत्या यूजरनेम आणि पासवर्डसह पुन्हा लॉग इन करा. 
- आपल्या आवडीचे यूजरनेम तयार करा, जो तुम्हाला कायम वापरावा लागणार आहे.
- अटी आणि शर्ती स्वीकारल्यानंतर लॉग-इन पासवर्ड आणि प्रोफाइल पासवर्ड सेट करा. आणि काही प्रश्नांची उत्तरे द्या.
- जन्मतारीख, जन्म स्थान आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.
- बँक खात्याची माहिती पाहण्यासाठी अकाउंट समरी या लिंकवर क्लिक करा.
- जर तुम्ही View only right नोंदणी केली असेल, तर तुमच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेच्या प्रिंटआउटसह तुमच्या Transcation right अॅक्टिव्हेट करण्यासाठी तुमच्या शाखेशी संपर्क साधू शकता.

जर तुम्ही यूजरनेम आणि पासवर्ड विसरला असाल तर....
- www.onlinesbi.com वर जा.
- फॉरगॉट लॉग-इन पासवर्ड या पर्यायावर क्लिक करा. यानंतर पुढील पानावरील Next वर क्लिक करा.
- आता तुमचे युजरनेम, खाते क्रमांक, देश, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, जन्मतारीख आणि एसबीआय नेटबँकिंगचा कॅप्चा सबमिट करा.
- तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो प्रविष्ट करा आणि कन्फर्म वर क्लिक करा. 
- आता लॉग-इन पासवर्ड रिसेट करण्यासाठी ३ पर्याय दिसतील. एटीएम कार्ड तपशील, प्रोफाइल पासवर्ड आणि एटीएम कार्ड
- आता प्रोफाइल पासवर्डशिवाय लॉग-इन पासवर्ड रिसेट करा.

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.