देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार होत आहेत.
देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार होत आहेत. त्यामुळेच फसवणुकीच्या घटनाही वाढल्याचे समोर येत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ट्विट करून आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. एसबीआयने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरच्या माध्यमातून लोकांना सतर्क केले आहे.
या मेसेजमध्ये स्टेट बँकेने एक इन्फोग्राफिकही शेअर केला आहे. या ट्विटमध्ये बँकेने ग्राहकांना एसएमएसद्वारे पाठवलेल्या एम्बेडेड लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे. असा कोणताही मेसेज आल्यास ग्राहकांनी नेहमी SBI चा शॉर्ट कोड तपासावा.
"#YehWrongNumberHai केवायसी फसवणुकीचे एक उदाहरण आहे. अशा एसएमएसमुळे फसवणूक होऊ शकते आणि तुम्ही तुमची सेव्हिंग्स काही क्षणात गमावू शकता. एम्बेड केलेल्या लिंकवर क्लिक करू नका. एसएमएस मिळाल्यावर, SBI चा योग्य शॉर्ट कोड तपासा, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
या मेसेजवर क्लिक करू नका
- इन्फोग्राफिकमध्ये एक कॉलआउट आहे जो ग्राहकांना एसएमएसची माहिती देते.
- हे एसएमएस एका गुप्त एम्बेड केलेल्या लिंकसह येतात. त्यावर क्लिक केल्याने हॅकर्सना ग्राहकांच्या खात्यात प्रवेश मिळतो. त्यानंतर ते मोठी रक्कम काढू शकतात.
- आपल्या ग्राहकांना एम्बेडेड लिंकवर एसएमएसद्वारे केवायसी अपडेट करण्यास कधीच सांगत नाही असे एसबीआयने म्हटले आहे.
मेसेज कसे असू शकतात याचे उदाहरणही एसबीआयने दिले आहे. "प्रिय ग्राहक, तुमची SBI कागदपत्रे कालबाह्य झाली आहेत. तुमचे खाते 24 तासांच्या आत ब्लॉक केले जाईल. तुमचे केवायसी अपलोड करण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा- httpp://ibit.ly/oMwK.
- "SBI तुम्हाला SMS मधील एम्बेड लिंकवर क्लिक करून तुमचे KYC अपडेट/पूर्ण करण्यास कधीही सांगत नाही. त्यामुळे सतर्क रहा असे आवाहन एसबीआयने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.