SBI Platinum की, HDFC Green Deposit; कोणती गुंतवणूक फायदेशीर?

SBI Platinum की, HDFC Green Deposit; 
कोणती गुंतवणूक फायदेशीर?
Updated on

देशात सध्या बँका ठेवींवर (Deposits) चांगल्या ऑफर देत आहेत. ठेव उत्पादनानुसार (Deposit Product) वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर आहेत. अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसी (HDFC) यांनी नवीन मुदत ठेवी (Fixed Deposite Product) सुरू केल्यात.

एकीकडे एसबीआयने प्लॅटिनम टर्म डिपॉझिट स्कीमची सुरुवात केली आहे तर दुसरीकडे एचडीएफसीकडून ग्रीन डिपॉझिटची (Green deposit) घोषणा केली आहे. आता या दोन्हींपैकी कोणती योजना गुंतवणुकदारांसाठी चांगली आहे ते जाणून घेऊ.

SBI Platinum की, HDFC Green Deposit; 
कोणती गुंतवणूक फायदेशीर?
शेतकऱ्यांवर उभ्या पिकांत मेंढ्या सोडून देण्याची वेळ

एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट ( SBI Platinum Deposit) देशातील सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेने अर्थात एसबीआयने 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास डिपॉझिट योजना आणली आहे. प्लॅटिनम टर्म डिपॉझिटच्या अंतर्गत ग्राहकांना 15 ऑगस्ट 2021 ते 14 सप्टेंबर 2021 पर्यंत 75 दिवस, 75 आठवडे, आणि 75 महिन्यांच्या काळासाठी फिक्स्ड डिपॉझिट्सवर 15bps पर्यंत जास्तीचे व्याज मिळू शकते. व्याजाचा विचार केल्यास एसबीआय सामान्यांसाठी 75 दिवसांच्या टर्म डिपॉझिटवर 3.90 टक्के व्याज देत आहे. तर प्लॅटिनम डिपॉझिटवर 3.95 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव आहे.

SBI Platinum की, HDFC Green Deposit; 
कोणती गुंतवणूक फायदेशीर?
पाटसकर कुटुंबाच्या जागेसाठी हिरवा झेंडा

525 दिवसांसाठी सध्या 5 टक्के व्याज मिळत आहे, पण प्लॅटिनमवर 5.10 टक्के व्याज मिळत आहे. तेच 2250 दिवसांच्या टर्म डेपॉझिटवर 5.40 टक्क्यांऐवजी 5.55 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याज दर 75 दिवसांच्या गुंतवणुकीवर सध्याच्या 4.40 टक्के व्याजाऐवजी 4.45 टक्के व्याज मिळेल, तर 525 दिवसांसाठी 5.50 टक्के व्याजाऐवजी 5.60 टक्के व्याज मिळेल शिवाय 2250 दिवसांसाठी 6.20 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव आहे.

SBI Platinum की, HDFC Green Deposit; 
कोणती गुंतवणूक फायदेशीर?
सोयाबीनवर 'मोझॅक' व्हायरसचा प्रादुर्भाव

एचडीएफसी ग्रीन डिपॉझिट हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (HDFC Ltd) ग्रीन अँड सस्टेनेबल डिपॉझिट्स (Green & Sustainable Deposits) योजना सुरू केली आहे. या योजनेबाबतीतली काही खास बाबी जाणून घेऊया.

कोणताही भारतीय यात गुंतवणूक करू शकतो. या योजनेत डिपॉझिट करण्याची मुदत 36 महिने ते 120 महिने आहे. ज्येष्ठ नागरिकांना दोन कोटी रुपयांच्या ठेवींवर अतिरिक्त 0.25 टक्के रक्कम मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.