नवी दिल्ली : GST परिषदेची बैठक १२ जून रोजी पार पडणार आहे. या वर्षातील परिषदेची ही दुसरी बैठक असणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला कमालीचं महत्त्व प्राप्त झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस महागाईतही वाढ होत आहे. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी GST परिषदेची बैठक बोलावली आहे. यामध्ये कोरोना महामारीशी निगडित औषधं, लसी आणि तपास उपकरणांवरील कर कमी केला जाण्याची शक्यता आहे. (second GST council meet scheduled 12 june check meeting agenda)
१२ जून रोजी होणाऱ्या बैठकीत कोविड संबंधित उत्पादनांवरील करात कपात केली जाऊ शकते. खासकरून ब्लॅक फंगसशी निगडित औषधांवरील करामध्ये कपात केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधी २८ मे २०२१ रोजी GST काउन्सिलची मागील बैठक पार पडली होती. यामध्ये PPE कीट, मास्क आणि लसीकरणाशी संबंधित वस्तूंवरील करकपातीसंबंधी मंत्र्यांच्या एका कमिटीची (Group of Ministers) ची स्थापना करण्यात आली होती. या कमिटीने ७ जून २०२१ रोजी आपला अहवाल GST काउन्सिलला सुपुर्द केला आहे.
मंत्रिगटाच्या अहवालावर होणार चर्चा
GST काउन्सिल संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ग्रुप ऑफ मिनिस्टर्स (GoM) यांनी सादर केलेल्या अहवालावर विचार आणि चर्चा केला जाणार आहे. या बैठकीत कोणकोणत्या वस्तूंवरील कर कमी केला जाऊ शकतो यावर विचार केला जाणार आहे, अशात कोरोना संबंधित सर्व बाबींवरील कर कमी केला जावा असं राज्याचं म्हणणं आहे.
पल्स ऑक्सिमीटरची किंमत कमी होणार का?
मंत्र्यांच्या कमिटीने दिलेल्या सूचनांमध्ये कोरोना संबंधित चिकित्सेतील पल्स ऑक्सिमीटर, हॅन्ड सॅनिटायझर, ऑक्सिजनसंबंधी उपचार उपकरणे (उदाहरणार्थ: व्हेन्टिलेटर्स, काँसंट्रेटर), PPE किट, N95 आणि सर्जिकल मास्क आणि थर्मामीटरवरील GST कमी केला जावा अशा सूचना दिल्या आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय GST काउन्सिलच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.