सेन्को गोल्डचाही IPO येणार, 525 कोटी उभारण्याची योजना

सेन्को गोल्ड लिमिटेडने (Senco Gold Ltd) बाजार नियामक सेबीकडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे (IPO) 525 कोटी रुपये उभारण्यासाठी मंजुरी मागितली आहे.
IPO
IPOSakal media
Updated on

येत्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना IPO द्वारे कमाईच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ज्वेलरी किरकोळ विक्रेते सेन्को गोल्ड लिमिटेडने (Senco Gold Ltd) बाजार नियामक सेबीकडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे (IPO) 525 कोटी रुपये उभारण्यासाठी मंजुरी मागितली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, सेन्को गोल्डने आयपीओशी संबंधित प्राथमिक कागदपत्रे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीसमोर सादर केली आहेत. (Senco Gold Ltd has sought approval from market regulator SEBI to raise Rs 525 crore through IPO)

IPO
ब्रोकरेजने सिमेंट सेक्टरमधला हा शेअर करेल दमदार कामगिरी; तज्ज्ञांना विश्वास

325 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर होतील जारी- पीटीआयच्या वृत्तानुसार, 325 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करण्यासोबतच, सेन्को गोल्ड लिमिटेड (Senco Gold Ltd) कंपनी विद्यमान शेअरहोल्डर सैफ पार्टनर्स इंडियाचे 200 कोटी रुपयांचे शेअर्स देखील विकणार आहे. याशिवाय, कंपनीने आयपीओआधी 65 कोटी रुपयांचे शेअर्स अलॉट करण्याची योजना आखली आहे. यामुळे IPO दरम्यान विक्रीसाठी जारी केल्या जाणाऱ्या शेअर्सचा आकार कमी होईल.

IPO
5 वर्षात 1 लाखाचे 94 लाख, तब्बल 9300 टक्के परतावा, कोणता आहे हा स्टॉक?

भांडवलाचा वापर कुठे करणार?

कोलकाता-स्थित कंपनी सेन्को गोल्ड लिमिटेड (Senco Gold Ltd) ही कंपनी आयपीओमधून उभारल्या जाणाऱ्या निधीपैकी 240 कोटी वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहेत. बाकीची रक्कम कंपनीच्या सामान्य कामांसाठी वापरली जाईल. सेन्को गोल्डचे देशभरातील 89 शहरे आणि शहरांमध्ये 127 आउटलेट आहेत, त्यापैकी 57 फ्रँचायझी मॉडेलवर चालतात.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.