शेअर मार्केटमध्ये महत्त्वाची घडामोड दिसून येतेय. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सकारात्मक बदल यामुळे भारतीय शेयर बाजाराने एक नवा विक्रम रचला आहे. सेन्सेक्सने आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक उसळी घेतली आहे. सेन्सेक्सने 50 हजारांहून अधिक अंकांची उसळी घेतली आहे. सकाळी नऊ वाजून 24 मिनीटानी सेन्सेक्स 266.96 अंकानी उसळला आणि 0.54 टक्क्यांनी वाढून तो 50,059.08 वर पोहचला आहे.
अमेरिकेत नव्या सरकारच्या पदार्पणानंतर कोरोनावरील नव्या उपायांसह बजेटमधील महत्त्वाच्या घोषणांमुळे आज बीएसईचे सेन्सेक्स प्री-ओपनिंग ट्रेडमध्ये 50 हजारचा टप्पा पार केला आहे. बीएसईचे सेन्सेक्स 319 अंकांनी तेजीत आहे. सेन्सेक्स 50,111.93 टप्प्यावर आला. तर निफ्टी 14,730.95 च्या अंकावर आहे. आज शेअर मार्केट सुरु होताच सुरुवातीच्या काही वेळेतच बँक निफ्टीमध्ये 0.49 टक्के म्हणजे 158.95 अंकांची उसळ पहायला मिळाली.
काल आयटी, उर्जा आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली घोडदौड दिसत होती. त्यामुळे बुधवारी शेअर बाजारात नव्या उंचाक दिसून आला. बीएसईच्या 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 393.83 अंकांवर म्हणजेच 0.80 टक्क्यांनी वाढून 49792.12 अंकांवर येऊन बंद झाला होता. या प्रकारेच एनएसईच्या निफ्टी 123.55 अंकांवर म्हणजेच 0.85 टक्क्यांनी उसळी मारुन 14,644.70 अंकांनी उसळी मारली होती. रिलायन्स, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकांसारख्या शेअरमुळे सेन्सेक्स पहिल्यांदाच 50 हजारांच्या पार गेला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.