गेले तीन दिवस शेअरबाजारात होत असलेली पडझड आज सर्वंकष खरेदीमुळे थांबली. आज सेन्सेक्स २७४.१२ अंश तर निफ्टी ८४.२५ अंश वाढला.
मुंबई - गेले तीन दिवस शेअरबाजारात होत असलेली पडझड आज सर्वंकष खरेदीमुळे थांबली. आज सेन्सेक्स २७४.१२ अंश तर निफ्टी ८४.२५ अंश वाढला.
आज युरोपातील शेअरबाजार नफा दाखवीत होते, तर चीनमधील कोविडच्या वाढत्या फैलावामुळे आशियातील शेअरबाजार संमिश्र कल दाखवीत होते. तरीही भारतीय शेअरबाजारांनी सुरुवातीला संथ सुरुवात केल्यावर नंतर खरेदी सुरु झाल्याने बऱ्याच शेअरचे भाव वाढले. दिवसअखेर सेन्सेक्स ६१,४१८.९६ अंशांवर तर निफ्टी १८,२४४.२० अंशांवर स्थिरावला.
आज उर्जा तसेच बांधकाम क्षेत्रे वगळता बहुतेक सर्व क्षेत्रे नफ्यात होती. सरकारी बँका, संरक्षण, जहाजबांधणी आदी क्षेत्रे विशेष तेजीत होती. जागतिक बाजारांमध्ये कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे भारतात सिमेंट, टायर आणि रंग कंपन्यांच्या शेअरचे दर वाढले. भारतीय शेअरबाजारांचा व्हॉलटॅलिटी इंडेक्स कमी झाल्याचेही जाणकार दाखवून देत आहेत.
नायका शेअरच्या बड्या गुंतवणुकदारांना आयपीओ नंतर आता शेअरविक्रीची संमती मिळाल्याने त्यांनी विक्रीचा धडाका सुरुच ठेवल्याने तो शेअर आज घसरून १७५ रुपयांपर्यंत आला. तर पेटीएम ला तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागेल अशी शक्यता मानांकन संस्थांनी व्यक्त केल्याने तो शेअरही पाचशेच्या खाली घसरून ४७७ रुपयांवर स्थिरावला.
आज सेन्सेक्सच्या प्रमुख शेअरपैकी नेस्ले, पॉवरग्रीड, एअरटेल, कोटक बँक व एचडीएफसी बँक किरकोळ घसरले. तर इंडसइंड बँक पावणेतीन टक्के वाढला. अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, इन्फोसिस, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, टाटास्टील, आयटीसी, महिंद्र आणि महिंद्र व टेक महिंद्र या शेअरचे भाव एक ते दीड टक्का वाढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.