देशांतर्गत रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक वाहतूक व्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चैतन्य निर्माण होऊन सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करून बंद झाला. परिणामी सेन्सेक्स 114 अंशांनी वधारून 30,933 वर बंद झाला. तर निफ्टी 40 अंशांनी वाढून 9,106.25 वर स्थिरावला.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दिवसभराच्या कामकाजात विमान वाहतूक क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या इंडिगोची प्रवर्तक कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन, स्पाईस जेट, रेल्वे कंपनी आयआरसीटीसी बरोबरच रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांचे उत्पादन घेणाऱ्या ऑटो क्षेत्रातील कंपन्या आणि आयओसी, भारत पेट्रोलियम, एचपी इत्यादी तेल कंपन्यांचे शेअर देखील मोठ्या प्रमाणात वधारून बंद झाले.
क्षेत्रनिहाय पातळीवर ऑटो, एफएमसीजी, मेटल आणि मीडिया निर्देशांक सर्वाधिक वधारून बंद झाला. तर, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि रिएल्टी निर्देशांक घसरले होते. सेन्सेक्सच्या मंचावर आयटीसी , एशियन पेंट्स, हिरोमोटोकॉर्प, मारुती आणि बजाज ऑटोचे शेअर सर्वाधिक वधारले होते. तर, इंडस इंड बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी कंपन्यांचे शेअर घसरले होते.
रुपया वधारला
आंतरराष्ट्रीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 19 पैशांनी वधारून 75.61 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला.
* दिवसअखेर सेन्सेक्स 114 अंशांनी वधारला
* निफ्टी 40 अंशांनी वधारला
* रुपया वधारून 75.61 रुपये प्रति डॉलरवर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.