शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्सची विक्रमी ६० हजारांवर झेप

share market
share marketshare market
Updated on
Summary

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार विक्रमी अंकांनी उघडला. सेन्सेक्स पहिल्यांदाच ६० हजारांच्यावर पोहोचला आहे.

गुरुवारी शेअर बाजारात मोठी उसळी बघायला मिळाली होती. जवळपास १००० हजार अंकांनी निर्देशांकात वाढ झाली होती. त्यानतंर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार विक्रमी अंकांनी उघडला. सेन्सेक्स पहिल्यांदाच ६० हजारांच्यावर पोहोचला आहे.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक सेन्सेक्स ३२५.७१ अंकांच्या वाढीसह उघडला. ही वाढ ०.५४ टक्के असून सेन्सेक्स ६० हजार २११.०७ वर पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज निफ्टी ९३.३० अंकांच्या वाढीसह १७ हजार ९१६.३० वर पोहोचला आहे.

share market
सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकावर, आज कोणत्या शेअर्सवर ठेवाल नजर?

गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ७१० अंकांनी वाढला होता. सुरुवातीच्या बाजारात १२९३ शेअर्समध्ये तेजी बघायला मिळाली तर ३५५ शेअर्समध्ये घसरण झाली होती. ८९ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.