मुंबई - जगभरात अर्थचक्र पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत आणि कोरोनावर लस येण्याबद्दल आशावाद या सकारात्मकतेने भांडवली बाजारात शुक्रवारी तेजी होती. मात्र दुसरीकडे कोरोनामुळे अमेरिका-चीनमध्ये व्यापारी संघर्ष पुन्हा भडकण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३३ अंशांनी वधारून ३२ हजार ४२४ अंशांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९० अंशांची वाढ झाली. तो ९ हजार ५८० पातळीवर बंद झाला.
शेअर बाजारात संमिश्र वातावरण
कोरोनावर लस मिळण्याबाबत आशावाद आणि कोरोना आणि हाँगकाँगवरून चीन आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
सेन्सेक्समध्ये दोन दिवसात १५०० अंशांची वाढ
शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी सकारात्मक पातळीवर बंद झाला आहे. परिणामी तीन दिवसात सेन्सेक्स १५०० हून अधिक अंशांनी वधारला आहे. जागतिक स्तरावरील भांडवली बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या परिणामाने देशांतर्गत बाजारात खरेदीचा उत्साह शुक्रवारी दिसून आला.
क्षेत्रीय पातळीवर रिअल्टी, फार्मा आणि एफएमजीसी कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीचा उत्साह होता.
सेन्सेक्सच्या मंचावर बजाज ऑटो, सन फार्मा, आयटीसी, एलअँडटी आणि एशियन पेंटचे शेअर सर्वाधिक वधारले होते. तर ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, इन्फोसिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआयच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.