मुंबई : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. लोकांची गुंतवणूक चार ते पाच पटीने वाढवली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्यांनी गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला आहे.
या शेअरमध्ये केवळ 1 लाख रुपये गुंतवणारेही आज कोट्यधीश झालेत. आम्ही एचईएल ग्लासकोट (HEL Glasscoat) शेअरबाबत बोलत आहोत. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. सध्या बाजारात शेअरची किंमत 662 रुपये आहे. हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये (HEL Glasscoat) 1 लाख रुपये गुंतवले असते तर तो आज कोट्यधीश झाला असता. या शेअरमुळे गुंतवणूकदारांच्या पैशात अनेक पटींनी वाढ झाली आहे.
दहा वर्षांपूर्वी या शेअरची किंमत केवळ 8.25 रुपये होती. तेव्हा कुणी यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला 12,121 शेअर्स मिळाले असते. 1:5 च्या गुणोत्तरामध्ये स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर, कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची होल्डिंग 60,605 (12,121 x 5) झाली असती.
स्विस ग्लासकोटच्या शेअरची किंमत आता सुमारे 666 आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती, तर त्यांच्या 1 लाखाचे आता अंदाजे 4 कोटी (666 x 60,605) झाले असते. स्विस ग्लासकोटचे शेअर्स सध्या एनएसई आणि बीएसई दोन्हीवर ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत. त्याची सध्याची मार्केट कॅप 4,552 कोटी आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.