Adani Group : शेअर मार्केटमध्ये दोन धमाके! एकाचं कनेक्शन अदानीशी तर दुसरा देणार तगडा रिटर्न

आजचा दिवस शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
Adani Group
Adani Groupsakal
Updated on

आजचा दिवस शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज मार्केटमध्ये दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. या दोन घटनेमुळे शेअर बाजारात महत्त्वाचा बदल दिसून येणार आहे. एकाचं कनेक्शन हे अदानीशी आहे तर दुसऱ्याचं कनेक्शन हे तगड्या रिटर्नशी आहे ज्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होणार.

आजपासून अदानी इंटरप्राइजेसचा एफपीओ (Adani Enterprises FPO) उघडला आहे तर दुसरी मोठी घडामोड म्हणजे आजपासून शेअर बाजारात टी+1 सेटलमेंट (T+1 Settlement) लागू झाली आहे. चला तर याविषयीच जाणून घेऊया.

Adani Group
Adani Group : हिंडेनबर्गचा अहवालाचा अदानींना फटका! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

अदानी इंटरप्राइजेसचा एफपीओ

सध्या गौतम अदानी आणि अडानी ग्रुप (Adani Group) साठी हा सर्वात वाईट काळ आहे कारण अदानीचे शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. अशात अदानी इंइंटरप्राइजेसचा एफपीओ आज खुला झालाय तर ३१ जानेवारीला बंद होणार आहे.

अँकर गुंतवणूकदारांना यात इनवेस्ट करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत संधी होती. अँकर गुंतवणूकदारांपासून कंपनीला आतापर्यंत जवळपास 6000 कोटी रुपये मिळाले आहे. हा एफपीओ जवळपास 20 हजार कोटी रुपयांचा असावा.

हा आतापर्यंतचा सर्वात महागडा एफपीओ आहे. या पूर्वी 2020 मध्ये एस बँकनी जवळपास 15 हजार कोटींचा एफपीओ आणला होता.

Adani Group
Stock Split : 1 वर्षात 'या' शेअरने दिला तब्बल 900% रिटर्न, आता होणार स्टॉक स्प्लिट

आजपासून शेअर बाजारात टी+1 सेटलमेंट सिस्टम सुरू

आपासून एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) वर T+1 नियम लागू करण्यात आलाय. T+1 नियम हा पुर्णपणे लागू होणार नाही. या नियमाला विशिष्ट स्टेपनी लागू केले जाणार. सेबीने सांगितले होते की एनएसई आणि बीएसईसारखे एक्सचेंज या नियमाला सर्व कंपन्यांच्या शेअरवर लागू करणार नाही तर ठराविक शेअर वर लागू होणार.

सध्या स्टॉक एक्सचेंजवर T+2 नियम लागू आहे. यात जर तुम्ही कोणताही शेअर खरेदी केला तर दोन दिवसाच्या व्यव्हारापर्यंत हा शेअर आपल्या डीमॅट खात्यामध्ये येतो. मात्र T+1 नियमनुसार ट्रेडिंगच्या आधल्याच दिवशी व्यव्हार बंद होतील म्हणजे फक्त 24 तासात व्यव्हार होणार.

जर तुम्ही सोमवारी कोणताही शेअर खरेदी केला तर दुसऱ्या दिवशी तो तुमच्या खात्यात येणार आणि शेअर विक्रीनंतर दुसऱ्याच दिवशी तुमच्या खात्यात पैसे येणार. यामुळे शेअर बाजारात लिक्विडिटी वाढली जाणार आणि ट्रेडींगचीसुद्धा संख्यामध्येही तेजी दिसणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.