रशिया-युक्रेन युद्ध आणि वाढत्या महागाईमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड अस्थिरता आणि अनिश्चितता आहे. या आव्हानांना तोंड देत भारतीय शेअर बाजाराने आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत सुमारे 90 मल्टीबॅगर स्टॉक्स पाहिले, तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2022 मध्ये 190 स्टॉक्स मल्टीबॅगर दिसून आले. अदानी ट्रान्समिशनचा शेअर (Adani Transmission) हा असाच एक शेअर आहे. अदानी ट्रान्समिशनमध्ये (Adani Transmission) गेल्या 1 वर्षात 175 टक्क्यांनी वाढ दिसली, तर गेल्या 6 वर्षांत हा स्टॉक 35 रुपयांवरून 2701 रुपयांपर्यंत वाढला आहे आणि या काळात सुमारे 7700 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Share Market: Adani Transmission has given heavy profit to the investors)
जर तुम्ही अदानी ट्रान्समिशनच्या शेअरच्या किमतीचा इतिहास पाहिला, तर गेल्या 1 महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक 2305 रुपयांवरून 2701 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत, त्यात सुमारे 17 टक्के वाढ दिसून आली आहे, तर या वर्षात आतापर्यंत हा शेअर 1730 रुपयांवरून 2701 रुपयांपर्यंत वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत स्टॉक 56 टक्क्यांनी वाढला आहे.
त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत, अदानी समूहाचा हा स्टॉक 1748 रुपयांवरून 2701 रुपयांपर्यंत वाढला. या कालावधीत हा स्टॉक 54 टक्क्यांनी वधारला आहे.
6 वर्षात 1 लाखाचे 78 लाख-
एखाद्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी अदानी ग्रुपच्या या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 1.17 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 1.54 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 31.75 लाख रुपये मिळाले असते. तर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 78 लाख रुपये मिळाले असते.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.