Share Market : तज्ज्ञांनी सुचवलेले हे शेअर्स देतील बंपर रिटर्न

सध्या शेअर बाजारात अस्थिर वातावरण आहे, अशात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
Share Market
Share Marketesakal
Updated on

Share Market : शेअर बाजारात पैसे गुंतवून तुम्ही चांगला नफा मिळवण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या शेअर बाजारात अस्थिर वातावरण आहे, अशात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. यात तुम्हाला शेअर बाजार तज्ज्ञ मदत करू शकतात. सेठी फिनमार्टचे विकास सेठी तुमच्यासाठी दोन चांगले शेअर्स घेऊन आले आहेत, ज्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

Share Market
Share Market : लवकरच येतोय मॅनकाईंड फार्माचा IPO, अधिक जाणून घेऊयात..

पूनावाला फिनकॉर्प (Poonawalla Fincorp)

कॅश मार्केटमध्ये विकास सेठी यांनी पूनावाला फिनकॉर्पची (Poonawalla Fincorp) निवड केली आहे. NBFC क्षेत्रातील ही एक अतिशय मजबूत कंपनी आहे. कंपनीचे लक्ष किरकोळ व्यवसायावर आहे, ज्यामध्ये परवडणाऱ्या गृहनिर्माण विभागाचा समावेश आहे. याशिवाय बिझनेस लोन, लोन विरुद्ध प्रॉपर्टी सेगमेंटमध्येही व्यवसाय आहे.

Share Market
Share Market: फक्त 18 हजारात गुंतवणुकदार बनले कोट्यधीश, 'या' शेअरचा छप्परफाड रिटर्न

यासोबतच सप्लाय चेन फायनान्स ,मशिनरी फायनान्सचा व्यवसायही करते. आदर पूनावाल हे प्रमोटर बनल्याने कंपनीची स्थिती मजबूत झाली आहे. कंपनीच्या कॉस्ट ऑफ फंडमध्ये कपात झाली आहे. जून तिमाहीत नफाही 140 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Share Market
Share Market: अप्पर सर्किटमध्ये 'ही' केमिकल कंपनी; अवघ्या 5 आठवड्यात वाढले 100% शेअर्स

मालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे आणि एनपीएमध्ये घट झाली आहे. FII आणि DII देखील कंपनीबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळेच, बाजार तज्ज्ञ विकास सेठींनी या स्टॉकवर खरेदीचे मत आहे. यासाठी 325 रुपयांचे टारगेट आणि स्टॉप लॉस 305 रुपयांवर ठेवायचा सल्ला दिला आहे.

Share Market
Share Market Wrap : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीत 2 टक्क्यांनी घसरण

फेडरल बँक (Federal Bank)

विकास सेठींनी दुसऱ्या शेअरसाठी फेडरल बँकेची निवड केली आहे. कारण बँक निफ्टी लाइफ हायवर ट्रेड करत आहे. बँकेचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत. जून तिमाहीच्या निकालात मोठी सुधारणा झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाचीही कंपनीत 3.7 टक्के भागीदारी आहे. फेडरल बँक फ्युचरवर खरेदीछा सल्ला दिला आहे. हा स्टॉक शॉर्ट टर्ममध्येच 130 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, तर 118 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवायचा सल्ला सेठींनी दिला आहे.

Share Market
Share Market Wrap : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीत 2 टक्क्यांनी घसरण

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.