शेअर बाजारात आज दिवसभर घसरण दिसून आली आहे. सकाळच्या सत्रातही घसरण दिसून आली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडल्याच दिसून आलं आहे. शेअर बाजाराच्या सुरवातीला बँक, ऑटो आणि मेटलच्या शेअर दरात मोठी घसरण झाली असल्याचे दिसून आले होते. याचा परिणाम बाजाराच्या घसरणीवर दिसून आला आहे. आज सेन्सेक्स 200 अंकाच्या घसरणीसह 57,991 वर बंद झाला तर निफ्टी 73 अंकाच्या घसरणीसह 17,241 वर बंद झाला आहे.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 750 अंकांनी तर निफ्टी 17100 अंकांनी गडगडला . सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 764 अंकांच्या घसरणीसह 57,426.95 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 234 अंकांच्या घसरणीसह 17,079.95 अंकांवर व्यवहार करत होता. आज रुपयाची डॉलरच्या तुलनेत पुन्हा घसरण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.