share Market: शेअर मार्केटमध्ये झळाळी; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला

आज दिवसभरात शेअर बाजारात चढ-उतार दिसून आले
share Market: शेअर मार्केटमध्ये झळाळी; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला
sakal
Updated on

आज दिवसभरात शेअर बाजारात चढ-उतार दिसून आले. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराची सुरवात सपाट अंकांनी झाली. शेअर बाजाराच्या शेवटच्या सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 300 अंकांची तेजी पाहायला मिळाली, तर निफ्टीमध्ये 92 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.51 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,141 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.52 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,622 अंकांवर स्थिरावला आहे.

शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 0.32 टक्क्यांची वाढ दिसून आली तर निफ्टीमध्ये 0.16 टक्यांची वाढ दिसून आली होती. आज सेन्सेक्स 97 अंकाच्या तेजीसह 58,963 वर सुरू झाला तर निफ्टी 45 अंकाच्या तेजीसह 17,582 वर सुरू झाला होता. आज शेअर बाजारातील 26 शेअरमध्ये चांगली तेजी असून 24 शेअर घसरणीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इन्फोसिस, एसबीआय, इंडसइंड बँक आणि अॅक्सिस बँकेत तेजी दिसून आली. 

पॉवरग्रीड, आयटीसी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टीसीएस, एनटीपीसी, नेस्ले, एचयूएल, भारती एअरटेल, एल अॅण्ड टी, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, कोटक बँक, टाटा स्टील, सन फार्मा आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.