शेअर बाजार कोसळला; Sensex 700 अंकानी घसरला, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान

अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.
Todays Share Market Updates
Todays Share Market Updatessakal
Updated on

Todays Share Market News:आठवड्याच्या सुरवातीच्या दोन दिवस शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. मात्र आज सुरवातीच्या सत्रातच शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून आली. दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 700 अंकानी घसरुन 51,800 वर बंद झाला तर निफ्टीतही 225 अंकाची घसरण होत 15,400वर बंद झाला. (share market closing update 22 june 2022)

शेअर बाजारात BPCL, HEROMOTOCO, TCS आणि MARUTI फक्त या चार कंपन्यांच्या शेअर मध्ये वाढ दिसून आली तर HDFC, TATAMOTORS, ICICIBANK, AXISBANK, RELIANCE, WIPRO सारख्या 46 कंपन्याच्या शेअर मध्ये घसरण दिसून आली.

Todays Share Market Updates
शेअर बाजार कोसळला; Sensex 700 अंकानी घसरला, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान

आज सुरवातीच्या सत्रापासून शेअर बाजारात पडझड होती. सेन्सेक्स 378 अंकाच्या घसरणीसह 52,153 वर सुरू झाला होता तर निफ्टी 126 अंकाच्या घसरणीसह 15,512 वर सुरू झाला.

मंगळवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून आली होती. मेटल आणि आयटी शेअर्स मध्ये सर्वाधिक वाढ झाली. सेन्सेक्स 934.23 अंकांच्या म्हणजेच 1.81 टक्क्यांच्या वाढीसह 52,532.07 वर बंद झाला होता तर दुसरीकडे, निफ्टी 288.65 अंकांच्या म्हणजेच 1.88 टक्क्यांच्या वाढीसह 15638.80 वर बंद झाला होता.

Todays Share Market Updates
Gold-silver Price: सोनं स्वस्त, चांदी स्थिर! जाणून घ्या आजचे दर

भारतात विक्रीचे कोणतेही संकेत नसल्याने शिवाय वस्तूंच्या किमतीत घसरण झाल्यामुळे बाजारात रिकव्हरी झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले होते. पण बाजार अत्यंत संवेदनशील स्थितीत आहे. त्यामुळे अशा वेळी अगदी लहान नकारात्मक ट्रिगरही बाजारात उलथापालथ घडवून आणू शकतो, असेही ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.