Share Market: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

मेटल, रिअॅल्टी आणि ऑटो शेअर्सना सर्वाधिक फटका बसला.
Share Market
Share Marketesakal
Updated on

बाजारातील तेजीला सध्या ब्रेक लागला आहे. सोमवारी बाजारात मोठी घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सचीही विक्री झाली. मेटल, रिअॅल्टी आणि ऑटो शेअर्सना सर्वाधिक फटका बसला. आयटी, फार्मा, इंफ्रा शेअर्सवर दबाव होता.

सेन्सेक्स 872 अंकांनी घसरून 58774 च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 268 अंकांनी घसरून 17491 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 688 अंकांनी घसरून 38298 वर बंद झाला. मिडकॅप 626 अंकांनी घसरत 30380 वर बंद झाला. बीएसईचे सर्व सेक्टर इंडेक्स लाल चिन्हात बंद झाले.

निफ्टीच्या 50 पैकी 43 शेअर्समध्ये घसरण झाली. त्याचवेळी सेन्सेक्समधील 30 पैकी 26 शेअर्स घसरले. निफ्टी बँकेचे सर्व 12 शेअर्स घसरले.

Share Market
Share Market : टेक्सटाइल सेक्टरमधला 'हा' शेअर देईल दमदार परतावा, तज्ज्ञांना विश्वास...

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बाजाराचे लक्ष पुन्हा एकदा ग्लोबल फॅक्टर्सकडे वळल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. कच्चा तेलाच्या किंमती घसरत आहे. याशिवाय अमेरिका-चीन तणावाचाही बाजारावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत, येत्या ट्रेडिंग सत्रात बाजार खूपच अस्थिर राहू शकतो असे ते म्हणाले. इंट्राडे आणि डेली चार्टवर तयार झालेल्या बियरीश कँडलमुळे नजीकच्या काळात कमजोरी येण्याचे संकेत मिळत आहेत. पण, जर निफ्टी 17,575 च्या वर राहण्यात यशस्वी झाला तर निफ्टीमध्ये किरकोळ पुल बॅक रॅली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर निफ्टी 17575 च्या खाली घसरला तर त्यात 17400-17350 ची पातळी दिसू शकते.

निफ्टी फॉलिंग ट्रेंड लाइनच्या खाली घसरला, जे अयशस्वी ब्रेकआउट दाखवत असल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. खाली, निफ्टी 17500-1740 च्या सपोर्ट झोनकडे गेला आहे. येत्या काळात, निफ्टी 17400 च्या खाली गेला तर ही घसरण आणखी खोल होईल. आता निफ्टीला 17200-17000 वर सपोर्ट दिसत आहे. दुसरीकडे, जर निफ्टी 17000 च्या खाली घसरला नाही तर यात वर 17700 ची पातळी दिसू शकते.

Share Market
Share Market: शेअर मार्केटच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्समध्ये 150 अंकांची घसरण

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

टाटा स्टील (TATASTEEL)

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

डिविस लॅब (DIVISLAB)

ट्रेंट (TRENT)

गोदरेज प्रॉपर्टींज (GODREJPROP)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

व्होल्टास (VOLTAS)

आयआरसीटीसी (IRCTC)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.