Share Market: शेअर बाजारात तेजीला मोठा ब्रेक; सेन्सेक्सची घसरगुंडी सुरूच

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाची घसरण सुरूच
Share Market: शेअर बाजारात तेजीला मोठा ब्रेक; सेन्सेक्सची घसरगुंडी सुरूच
sakal
Updated on

जागतिक आर्थिक स्थितीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहे. बाजारात मागील आठवड्यातील ट्रेंड कायम असून आज सेन्सेक्स 953 हून अधिक अंकांनी घसरला आहे.शेअर बाजारात आज दिवसभरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 953 अंकांची घसरण पाहायला मिळाली, तर निफ्टीमध्ये 311 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 1.64 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,145 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 1.80 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,016 अंकांवर स्थिरावला आहे.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले आहे. सुरवतीच्या सत्रात 700 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली आहे. बाजाराची सुरवात होताच सेन्सेक्समध्ये 550 अंकांची घसरण झाली तर, निफ्टी निर्देशांकामध्ये 17, 160 अंकांखाली गेला होता. आशियाई शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून येत आहे. त्याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाची घसरण सुरूच आहे. आज व्यवहार सुरू झाल्यानंतर रुपयाने आतापर्यंतचा नीचांकी दर गाठला आहे. रुपयात सातत्याने होत असलेल्या घासरणीमुळे चिंता वाढली आहे. शुक्रवारी रुपया 80.90 रुपये प्रति डॉलरवर खुला झाला होता. त्यानंतर आज 62 पैशांची घसरण दिसून आली. आज बाजार सुरू झाल्यानंतर रुपया 81.52 रुपयांवर खुला झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.