शेअर बाजारात आज दिवसभरात घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवातही घसरणीसह झाली आहे. अमेरिकन शेअर बाजार आणि जागतिक शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे. सेन्सेक्समध्ये 0.89 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,598 अंकांवर स्थिरावला आहे. तर निफ्टीमध्ये 8.87 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,858 अंकावर पोहोचला.
सकाळच्या सत्रात शेअर बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर बाजारात विक्रीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची पडझड झाली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 136.85 अंकांनी घसरत 16,870 अंकांवर खुला झाला होता. भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरुच असून आजही गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.