आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार हिरव्या रंगात होता. सुरवातीच्या सत्रापासून शेअर बाजारात तेजी होती. अखेर दुसऱ्या सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 712 अंकानी 57,570 वर बंद झाला तर निफ्टी 228 अंकाच्या तेजीसह 17,158 वर बंद झाला.
आज शेअर बाजारात तब्बल 43 शेअर्समध्ये तेजी होती तर 7 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. यात प्रामुख्याने KOTAKBANK,AXISBANK,POWERGRID, SBIN सारख्या कंपनीचे शेअर्स घसरले तर बँकीग, आयटी तसेच फार्मा शेअर्समध्ये आज लक्षणीय वाढ दिसून आली. (share market update)
पहिल्या सत्रात आज बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 400 हून अधिक अंकांनी उसळी घेत 57,258.13 वर सुरुवात केली. तर निफ्टीही 49.90 अंकांनी वधारल्याचं पाहायला मिळालं. बाजार सुरु होताच 17,079.50 वर व्यवहार करत होता.
गॅप ओपनिंगसह, निफ्टी (Nifty) गुरुवारी 16750 च्या आसपास स्विंग हायवर जाताना दिसला होता आणि त्याने 16800 हा जूनचा उच्चांक ओलांडल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. गुरुवारी दिवसभर बाजारात तेजी कायम राहिली. अशा परिस्थितीत, 16750-16800 हा निफ्टीसाठी आता निअर टर्म सपोर्ट झोन बनला आहे.
आज शेअर बाजारात SBILIFE, TATASTEEL,HINDALCO, COALINDIA, HDFCLIFE, RELIANCE WIPRO, BAJFINANCE या सारख्या 43 शेअर्समध्ये आज लक्षणीय वाढ झाली आहे. एकंदरीत आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी उत्तम होता. गुंतवणूकदारांनी कोट्यवधींची कमाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.