Share Market: शेअर बाजारात तेजीनंतर घसरण, सेन्सेक्स 188 अंकांनी घसरला

आरबीआयने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला
Share Market Updates
Share Market Updatesesakal
Updated on

सकाळच्या क्षेत्रात शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली असूनही बाजार बंद होताना मात्र त्यामध्ये घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आज शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 0.33 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,409 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.24 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,818 अंकांवर स्थिरावला. आरबीआयने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे.

सकाळच्या सत्रात बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर बाजारात सेन्सेक्समध्ये 436 हून अधिक अंकांची तेजी दिसून आली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 149 अंकांनी वधारला आणि 17,008 अंकांवर खुला झाला होता. तर सेन्सेक्स 57,039 अंकांवर खुला झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.