आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात अस्थिरता होती. गुरुवारी शेअर बाजारात तेजी होती. मात्र आज सुरवातीच्या सत्रापासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. अखेर घसरणीसह शेअर बाजार बंद झाला.
आज सेन्सेक्स 30.18 अंकाच्या घसरणीसह 58,191 वर बंद झाला तर निफ्टी 17.15 अंकाच्या घसरणीसह 17,314वर बंद झाला. आज शेअर बाजारात टाटाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
गुरुवारी बाजारात विक्रीचा जोर वाढला होता. सेन्सेक्स 157 अंकांनी वाढून 58222 वर बंद झाला तर निफ्टी 58 अंकांनी वाढून 17323 वर बंद झाला होता मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे शेअर बाजारात तेजी दिसून आली नाही आणि गुंतवणूकदारांमध्ये निराशा दिसून आली.
Tata Consumer, BPCL, TCS आणि SBI सारख्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली तर IndusInd Bank, Titan Company, Maruti Suzuki सारख्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली.
येत्या काळात 'या' शेअर्समध्ये दमदार नफा
अल्ट्राटेक सिमेंटची (UltraTech Cement) किंमत सध्या 7,500 रुपये आहे. अल्ट्राटेक सिमेंटशिवाय नवरतन एसआयपी (Navratan SIP) इंडीगो (Indigo) आणि इंटरग्लोब एविएशनची (Interglobe Aviation) निवड केली आहे. एविएशन सेक्टरमध्ये सध्या तेजी दिसून येत आहे. इंटरग्लोब एविएशनचा (Interglobe Aviation) शेअर आता 2,500 रुपयांवर ट्रेड करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.