शेअर बाजारात पडझड कायम, दोन दिवसात गुंतवणूकदारांचे बुडाले 6.65 कोटी

16 मार्च 2022 नंतर पहिल्यांदाच निफ्टी हा 17 हजारांखाली आला आहे.
share market closing update
share market closing updateSakal
Updated on

Share Market : सकाळी काहीशी तेजीसह उघडला मात्र दुपारनंतर शेअर बाजारात घसरण दिसली. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 703 अंकांनी घसरला तर निफ्टीही 215 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये 1.23 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,463 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,958 वर पोहोचला आहे. (share market closing update, sensex and nifty down )

आज 1111 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2216 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 118 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 16 मार्च 2022 नंतर पहिल्यांदाच निफ्टी हा 17 हजारांखाली आला आहे.

share market closing update
दमदार कमाई करुन देतील हे दोन शेअर्स, तज्ञांचा विश्वास..

मंगळवारी शेअर बाजारात HDFC, HDFC Life, SBI Life Insurance, HDFC Bank आणि Tata Consumer Products या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Apollo Hospitals, Coal India, Reliance Industries, ICICI Bank आणि BPCL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झालेली दिसून आली.

share market closing update
आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड ? कोणत्या १० शेअर्सवर कराल फोकस ?

गेल्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवणे फायदेशीर ठरु शकते.

नुकताच इन्फोसिसने मार्जिनमध्ये प्रेशर दाखवला आहे, ज्यामुळे एडीआरमध्ये कमजोरी आली आहे. पण त्याचे गाईडलाईन्स खूप सकारात्मक आहे. अशा परिस्थितीत महागाईच्या दबावामुळे नोकरभरती वाढू शकते. पण या सगळ्यात मिडकॅप आयटी आऊटपरफॉर्म करेल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.