चार दिवसांच्या तेजीनंतर गुरूवारी बाजारात किरकोळ नफा-वसुली झाली. सेन्सेक्स 621 अंकांनी घसरला. त्याचवेळी निफ्टीनेही 179 अंकांची घसरण नोंदवली.
आयटी आणि रियल्टी शेअर्समध्ये (Shares)सर्वाधिक घसरण झाली. निफ्टीसोबतच (Nifty) निफ्टी बँक आणि मिडकॅप निर्देशांकांवरही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. एफएमसीजी आणि धातू शेअर्सवरही दबाव राहिला. दुसरीकडे वाहन, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली. बँकिंग निर्देशांक खालच्या पातळीवरून वर बंद झाला.
व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स (Sensex) 621.31 अंकांनी अर्थात 1.03 टक्के घसरून 59,601.84 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 179.35 अंक अर्थात 1.00 टक्के घसरून 17745 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीने डेली स्केलवर लॉन्गर लोअर शॅडो तयार केली आहे जी घसरणीत खरेदी दाखवत आहे. निफ्टीला 18,000 -18,200 च्या दिशेने जाण्यासाठी 17,777 च्या वर राहावे लागेल, असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. आता निफ्टीचा सपोर्ट झोन 17600 -17500 वर आला आहे.
घसरणीसह ओपनिंग असूनही बाजार पुन्हा सावरल्याचे दीनदयाल इन्व्हेस्टमेंट्सचे मनीष हथिरामानी म्हणाले. जोपर्यंत निफ्टी 17200 ची पातळी तोडत नाही तोपर्यंत बाजाराचा अल्पकालीन कल सकारात्मक राहील असेही ते म्हणाले.
तांत्रिक चार्ट निफ्टीसाठी अप्पर बोलिंजर बँड फॉर्मेशनवर इमीजिएट रझिस्टेंस दाखवत असल्याचेही ते म्हणाले. MACD आणि RSI सारखे तांत्रिक निर्देशक अजूनही सकारात्मक क्रॉसओव्हरसह व्यापार करत आहेत जे तेजीच्या ट्रेंडला समर्थन देत आहेत. सध्या निफ्टीला 17600 वर सपोर्ट आहे. त्याच वेळी, 18000 वर रझिस्टेंस आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 36700 वर सपोर्ट आणि 38000 वर रझिस्टेंस आहे.
- यूनायटेड फॉस्फरस लिमिटेड (UPL)
- इंडसइंड बँक (INDUSINDBK)
- बजाज ऑटो (BAJAJAUTO)
- भारती एअरटेल (BHARTIARTL)
- मारुती (MARUTI)
- गुजरात गॅस (GUJRATGASLTD)
- भारत फोर्ज (BHARATFORGE)
- बाटा इंडिया (BATAINDIA)
- टाटा पॉवर (TATAPOWER)
- एल्केम लेबोरेटोरीज (ALKEM)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.