Share Market : मंगळवारी शेअर बाजारात पुन्हा तेजी!

आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक ?
Share Market News Updates
Share Market News UpdatesSakal
Updated on

दोन दिवसांच्या घसरणीनंतर, मंगळवारी शेअर बाजारात (Share Market) पुन्हा तेजी दिसली. रशिया-युक्रेन संकटात नरमाई आल्याच्या बातमीने बाजारात तेजी दिसून आली. निफ्टीने 1 फेब्रुवारी 2021 नंतरची सर्वात मोठी इंट्रा-डे रॅली पाहिली. बीएसईचे सर्व क्षेत्र निर्देशांक वाढीने बंद झाले.

Share Market News Updates
कॅश मार्केटचे 2 बेस्ट शेअर्स, तज्ज्ञ काय सांगतायत पाहूया...

स्मॉल आणि मिड कॅपही चांगले चमकले. मोठ्या शेअर्सबरोबरच लघु-मध्यम शेअर्समध्येही मोठी तेजी दिसून आली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 817 अंकांच्या वाढीसह 29,375 वर बंद झाला. तर निफ्टीच्या 50 पैकी 48 शेअर्समध्ये वाढ झाली, तर सेन्सेक्समधील (Sensex) सर्व 30 शेअर्सची खरेदी झाली. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. मंगळवारी दिवसा अंती सेन्सेक्स 1736.21 अंकांच्या अर्थात 3.08 टक्क्यांच्या वाढीसह 58,142.05 वर बंद झाला. निफ्टी 90.45 अंकांच्या अर्थात 0.54 टक्क्यांच्या वाढीसह 16,933.25 वर बंद झाला.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी होण्याच्या आशेने परदेशी बाजारात चांगली रिकव्हरी झाल्याचे जिओजित फायनान्शिअलचे विनोद नायर म्हणाले. कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण शिवाय देशांतर्गत बाजारातही सोमवारच्या घसरणीतून सावरताना चांगली वाढ दिसली.

Share Market News Updates
येत्या एक वर्षात 'हे' 3 शेअर्स करतील मजबूत कमाई!

आज बाजारात काय स्थिती असेल ?

निफ्टीने डेली चार्टवर 200 डीएमएचा आधार घेतल्याचे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले. संपूर्ण चार्टवर, निफ्टी 21*50-HMA वर पॉझिटीव्ह क्रॉस ओव्हरसह बंद झाला. जे पुढील ट्रेडिंग सत्रांमध्ये तेजीचे लक्षण आहे. सध्या निफ्टीला 16800 वर सपोर्ट आहे तर 17500 वर रेझिस्टन्स दिसत आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 37300 वर सपोर्ट आहे आणि 39000 वर रेझिस्टन्स दिसत आहे.

निफ्टीने डेली चार्टवर एक लाँग बुलीश कँडल तयार केली आहे जी नजीकच्या काळात पुलबॅक रॅली सुरू ठेवण्याचे संकेत देत असल्याचे कोटक सिक्युरिटीचे श्रीकांत चौहान म्हणाले. निफ्टीसाठी 17450-17550 वर रेझिस्टन्स दिसत आहे, जोपर्यंत निफ्टी 17200 च्या वर राहील तोपर्यंत तो 17450-17550 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर निफ्टी 17200 च्या खाली घसरला तर त्यात 17100- 17,050 ची पातळी देखील पाहू शकतो.

Share Market News Updates
5 वर्षात दिला 500 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का 'हे' शेअर्स?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- टाटा मोटर्स (TATAMOTORS)

- बजाज फायनान्स (BAJFINANCE)

- आयशर मोटर्स (EICHERMOT)

- श्री सिमेंट (SHREECEM)

- हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

- एलआयसी हाउसिंग फायनान्स (LICHSGFIN)

- झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

- एसआरएफ लिमिटेड (SRF)

- पेज इंडिया (PAGEIND)

- गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.