Share Market : शेअर बाजारावर पुन्हा घसरणीचे सावट

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
Share Market
Share MarketSakal
Updated on
Summary

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि यूएस फेडची आगामी बैठक यामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे.

सेन्सेक्स-निफ्टी मंगळवारी 1 टक्‍क्‍यांहून अधिक घसरून बंद झाले, आणि यासोबतच गेल्या 5 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. मंगळवारच्या व्यवहारात ऑटो सोडता सर्वच सेक्टर्समध्ये विक्री दिसून आली. दुपारच्या व्यवहारात विक्रीचा दबाव वाढला. याचे कारण चीनमध्ये कोविड-19 (Covid-19)ची वाढत जाणारी प्रकरणे ठरली. याशिवाय रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि यूएस फेडची आगामी बैठक यामुळे शेअर बाजारात (Share Market) अनिश्चिततेचे वातावरण आहे. शेवटच्या ट्रेडिंग तासात बाजारात थोडी रिकव्हरी झाली असली तरी अखेरीस तो लाल चिन्हाने बंद झाला. मंगळवारी सेन्सेक्स (Sensex) 709.17 अंकांनी म्हणजेच 1.26 टक्क्यांनी घसरून 55,776.85 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty)208.30 अंकांनी म्हणजेच 1.23 टक्क्यांनी घसरून 16,663.00 वर बंद झाला.

Share Market
Share Market: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 177.87 तर निफ्टी 29.25 अंकांनी वधारला

गॅस आयात थांबवण्याबरोबरच रशियावरील नवीन व्यापार आणि आर्थिक निर्बंधांमुळे मंगळवारी जगभरातील इक्विटी मार्केटमध्ये घसरण दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. मात्र, रशिया आणि युक्रेन यांच्यात करार होईल या आशेने गेल्या काही दिवसांपासून बाजारात सुधारणा होत होती. ही सुधारणा आता मोडकळीस आली आहे.

आज बाजाराची वाटचाल कशी होईल ?

निफ्टी 16500-16400 च्या वर राहील तोपर्यंत त्यात तेजीची शक्यता असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 16,900-16,950 वर रझिस्टंस दिसून येत आहे. दुसरीकडे, जर निफ्टी 16,400 च्या खाली घसरला तर ही कमजोरी 16,350-16,300 च्या दिशेने जाऊ शकते. आगामी काळात बाजार अस्थिर राहण्याची शकय्ता चौहान यांनी व्यक्त केली.

Share Market
शेअर बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स 985, तर निफ्टी 241 अंकांनी वधारला

निफ्टीने मंगळवारी डेली चार्टवर डार्क क्लाउड कव्हर तयार केल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. कारण त्याला डेली चार्टवर 200DMA च्या आसपास रझिस्टंसचा सामना करावा लागला. खाली फॉलिंग चॅनलच्या अप्पर बँडवर सपोर्ट मिळत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच निफ्टी जोपर्यंत 16,640 च्या पातळीवर स्थिर राहील, तोपर्यंत तो मजबूत राहण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 16,900-17,000 वर रझिस्टंस दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- टाटा कंझ्युमर (TATACONSUME)

- महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

- सिप्ला (CIPLA)

- श्री सिमेंट (SHREECEM)

- मारुती (MARUTI)

- ए यु बँक (AUBANK)

- एसआरएफ लिमिटेड (SRF)

- अशोक लेलँड (ASHOKLEY)

- व्होल्टास (VOLTAS)

- महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्स (M&MFIN)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.