शेअर बाजाराचे लक्ष तिमाही निकाल आणि या आठवड्यात होणाऱ्या आरबीआयच्या बैठकीकडे असेल.
एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसी यांच्या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर, भारतीय इक्विटी मार्केट सोमवारी 2 टक्क्यांहून अधिक वधारला. विशेष म्हणजे या विलीनीकरणामुळे मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आकार घेईल. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) 60,845.10 आणि 18,114.65 च्या पातळीवर पोहोचले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1335.05 अंकांच्या अर्थात 2.25 टक्क्यांच्या वाढीसह 60,611.74 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 382.95 अंकांच्या अर्थात 2.17 टक्क्यांच्या वाढीसह 18053.40 वर बंद झाला.
एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या विलीनीकरण घोषणेमुळे देशांतर्गत बाजारात जोरदार तेजी दिसून आल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. या बातमीमुळे शेअर बाजार आणि आर्थिक दोन्ही क्षेत्रात अतिशय सकारात्मक वातावरण होते. आता बाजाराचे लक्ष तिमाही निकाल आणि या आठवड्यात होणाऱ्या आरबीआयच्या बैठकीकडे असेल.
आज शेअर बाजाराची काय स्थिती असेल ?
निफ्टी 18000 च्या वर जाताना दिसला तसेच डेली चार्टवर मागच्या कंसोलिडेशनच्या लेव्हलवर राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टी 200- DEMA च्या वर गेला आहे. बाजाराचा येणारा काळ खूपच सकारात्मक दिसत आहे. वर निफ्टी डेली चार्टवर फॉलिंग ट्रेड लाइनकडे जाताना दिसतो. निफ्टीचा पहिला रझिस्टंस 18,150 वर दिसतो, तर 17,800 वर सपोर्ट दिसत आहे.
HDFC Ltd आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणाच्या घोषणेमुळे भारतीय इक्विटी मार्केटसाठी खूप चांगला होता असे Tradingo चे पार्थ न्याती म्हणाले. सोमवारच्या निफ्टीच्या वाढीमध्ये HDFC ट्विन्सचे योगदान 70 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे सोमवारी बाजारात शॉर्ट कव्हरिंग आल्याचे दिसून आले. जागतिक संकेत सध्या स्थिर आहेत. वस्तूंच्या किमती थंडावल्या आहेत. एफआयआय पुन्हा खरेदी करताना दिसत आहेत. या सगळ्यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. या महिन्यात बाजार नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.
आजचे टॉप 1O शेअर्स कोणते ?
- एचडीएफसी बँक (HDFCBANK)
- एचडीएफसी (HDFC)
- अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
- एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
- कोटक बँक (KOTAKBANK)
- आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBANK)
- आयआरसीटीसी (IRCTC)
- टाटा पॉवर (TATAPOWER)
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
- एयू बँक (AUBANK)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.