Share Market : नव्या वर्षाचा इफेक्ट! शेअर बाजारात तेजी कायम

आज कोणत्या शेअर्सवर लक्षकेंद्रित कराल
Share Market
Share Marketesakal
Updated on
Summary

बाजाराला तेल आणि वायू, धातू, ऑटो, रिअॅलिटी शेअर्सचा मोठा सपोर्ट मिळाला.

शेअर बाजारात (Share Market) बुधवारी सलग चौथ्या दिवशी तेजी दिसून आली. सेन्सेक्स (Sensex)निफ्टीने (Nifty)आपली महत्त्वाची मानसिक पातळी ओलांडली. बाजाराला तेल आणि वायू, धातू, ऑटो, रिअॅलिटी शेअर्सचा मोठा सपोर्ट मिळाला.

बुधवारी व्यवहारा अंती सेन्सेक्स (Sensex) 367.22 अंकांच्या म्हणजेच 0.61 टक्क्यांच्या वाढीसह 60,223.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 120 अंकांच्या अर्थात 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 17,925.30 वर बंद झाला.

Share Market
Share MarketSakal media

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने डेली स्केलवर बुलिश कँडल तयार केल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. यासोबतच सलग चौथ्या दिवशीही हायर हाइज आणि हायर लोज कायम राखला. आता 18,000 -18200 च्या दिशेने जाण्यासाठी निफ्टीला 17,900 च्या वर राहावे लागेल. यासाठीचा सपोर्ट 17,777 आणि 17,600 च्या झोनकडे सरकला आहे.

निफ्टी त्याच्या 18,000-18,100 च्या रेझिस्टन्स झोनच्या जवळ असल्याचे LKP सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे म्हणाले. निफ्टीनेही या पातळीच्या वर राहण्यात यश मिळवले तर तो आणखी वर जाईल असेही ते म्हणाले. निफ्टी त्याच्या पूर्वीच्या स्विंग हायच्या जवळ जाताना दिसत असल्याचेही ते म्हणाले. खाली, निफ्टीला 17,800 आणि 17,700 झोनमध्ये सपोर्ट दिसत आहे.

17,800 चा टप्पा पार करताच बाजाराने मोठा अडथळा पार केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे सहज अग्रवाल यांनी सांगितले. अनिश्चित आणि अस्थिर टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर निफ्टी आता निश्चित दिशेने वाटचाल करताना दिसेल असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. मध्यम कालावधीत निफ्टी 19,500 ची पातळी पाहू शकतो अशी शक्यता आहे. यापुढे धातू, एफएमसीजी, ऊर्जा आणि बँकिंग शेअर्समध्ये वाढ दिसून येत असल्याचे ते म्हणाले. आयटी स्टॉकमधील घसरण झाल्यास खरेदीचा सल्ला त्यांनी दिला.

Share Market updates
Share Market updatesFile Photo

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

- बजाज फायनान्स (BAJFINANCE)

- कोटक बँक (KOTAKBANK)

- जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

- ग्रासिम (GRASIM)

- ए यू बँक (AUBANK)

- अशोक लेलँड (ASHOKLEY)

- बँक ऑफ इंडिया (BANKINDIA)

- हिन्दुस्थान ऐरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

- कॅनरा बँक (CANBK)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.