नवा आठवडा, नवा दिवस कसा असेल शेअर बाजारासाठी?

दिग्गजांव्यतिरिक्त, लघु आणि मध्यम शेअर्समध्येही गेल्या आठवड्यात दबाव दिसून आला.
Share Market
Share MarketSakal
Updated on
Summary

दिग्गजांव्यतिरिक्त, लघु आणि मध्यम शेअर्समध्येही गेल्या आठवड्यात दबाव दिसून आला.

17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात आयटी क्षेत्र (IT sector) वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. परिणामी, BSE सेन्सेक्स (Sensex) 1,755 अंकांनी घसरून 57,012 अंकांवर बंद झाला आणि गेल्या आठवड्यात निफ्टी (Nifty)17,000 च्या पातळीच्या खाली घसरला आणि 16,985.20 वर बंद झाला. दिग्गजांव्यतिरिक्त, लघु आणि मध्यम शेअर्समध्येही गेल्या आठवड्यात दबाव दिसून आला. गेल्या आठवड्यात, साप्ताहिक आधारावर, बीएसई मिडकॅप (BSE Midcap) 4.5 टक्के आणि स्मॉल कॅप (Small cap) 2.75 टक्के घसरणीसह बंद झाला.

Share Market
SPIC शेअर्स येत्या 3 महिन्यांत देणार 36 टक्के नफा!

गेल्या आठवड्यात शेअर बाजार (share market) लाल चिन्हात अर्थात घसरणीसह बंद झाला. यूएस फेडरल रिझर्व्हकडून (US Federal Reserve) चलनविषयक धोरण कडक करण्याची चिन्हे आणि बँक ऑफ इंग्लंडकडून (Bank of England) अचानक व्याजदरात झालेली वाढ, तसेच ओमिक्रॉन आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल सेलिंगमधील (FII selling) तेजी यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला.

ओमिक्रॉन (Omicron) हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना (Corona) विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉन, भारतासह जगातील 89 देशांमध्ये पसरला आहे. भारतात आतापर्यंत 143 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ओमिक्रॉन ही अर्थव्यवस्था (Economy) आणि बाजार (Market) या दोन्हींसाठी मोठा धोका असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्व संशोधन अहवालांमध्ये असे आढळून आले आहे की, जास्त संसर्ग असूनही, ओमिक्रॉन डेल्टा प्रकारापेक्षा कमी प्राणघातक आहे ही दिलासा देणारी बाब आहे. पुढील काही आठवडे बाजार ओमिक्रोमशी संबंधित बातम्यांवर लक्ष ठेवेल असे हेम सिक्युरिटीजचे (Hem Securities) मोहित निगम म्हणाले.

Share Market
शेअर बाजार तज्ज्ञांकडून Ipca Laboratoriesचे शेअर्स घेण्याचा सल्ला!

गेल्या आठवड्यात शेअर बाजार लाल चिन्हात अर्थात घसरणीसह बंद झाला. यूएस फेडरल रिझर्व्हकडून (US Federal Reserve) चलनविषयक धोरण कडक करण्याची चिन्हे आणि बँक ऑफ इंग्लंडकडून (Bank of England)अचानक व्याजदरात झालेली वाढ, तसेच ओमिक्रॉन आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल सेलिंगमधील (FII selling) तेजी यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला.

ओमिक्रॉन हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉन, भारतासह जगातील 89 देशांमध्ये पसरला आहे. भारतात आतापर्यंत 143 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ओमिक्रॉन ही अर्थव्यवस्था आणि बाजार या दोन्हींसाठी मोठा धोका असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्व संशोधन अहवालांमध्ये असे आढळून आले आहे की, जास्त संसर्ग असूनही, ओमिक्रॉन डेल्टा प्रकारापेक्षा कमी प्राणघातक आहे ही दिलासा देणारी बाब आहे. पुढील काही आठवडे बाजार ओमिक्रोमशी संबंधित बातम्यांवर लक्ष ठेवेल असे हेम सिक्युरिटीजचे (Hem Securities) मोहित निगम म्हणाले.

Share Market
Go Fashionचे शेअर्स वधारले! गुंतवणूकदारांना तब्बल 91 टक्क्यांचा परतावा

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीमध्ये डेली आणि वीकली या दोन्ही चार्टवर मोठी बियरिश कँडल (large bearish candle) तयार झालेली दिसली आहे. निफ्टी 18 डिसेंबर रोजी 1.5 टक्क्यांनी घसरला, तर गेल्या आठवड्यात सुमारे 3 टक्क्यांनी घसरून 17,000 च्या पातळीच्या खाली आला. याचा अर्थ बाजारात मंदीचे सावट कायम राहण्याची चिन्हे आहेत.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- विप्रो (WIPRO)

- इन्फोसिस (INFOSYS)

- एचसीएल टेक (HCLTECH)

- पॉवर ग्रीड (POWERGRID)

- सन फार्मा (SUNPHARMA)

- भारत हेवी इलेक्ट्रिकल (BHEL)

- झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

- गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

- कॅनरा बँक (CANBK)

- श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड (SRTRANSFIN)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.