शेअर बाजारावर सावट! आज कोणत्या शेअर्सवर लक्ष केंद्रित कराल?

कमकुवत जागतिक संकेतांचाही बाजारावर दबाव दिसून आला.
Share Market
Share MarketSakal
Updated on
Summary

कमकुवत जागतिक संकेतांचाही बाजारावर दबाव दिसून आला.

20 डिसेंबरला शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. त्यात ओमिक्रोनच्या (Omicron)गोंधळामुळेही बाजार 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला. बाजारात सोमवारी फक्त आणि फक्त विक्री झाल्यानेही बाजाराने निचांकी पातळी गाठली. कमकुवत जागतिक संकेतांचाही बाजारावर दबाव दिसून आला. बेंचमार्क निर्देशांक 2 टक्क्यांहून अधिक घसरले आणि एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्स (Sensex) सोमवारी 1189.7 अंकांनी अर्थात 2.1 टक्क्यांनी घसरून 55,822.01 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 371 अंकांनी अर्थात 2.2 टक्क्यांनी घसरून 16,614.20 वर बंद झाला.

Share Market
2022 मध्ये धमाका उडवणारा मल्टीबॅगर स्टॉक तुमच्याकडे आहे का?
Share Market
Share MarketSakal

गेल्या दोन महिन्यांपासून मार्केटमध्ये कंसोलिडेशनचा टप्पा सुरू आहे असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. FIIची प्रचंड विक्री, जगभरातील मध्यवर्ती बँकांची आर्थिक धोरणे कडक करणे, यामुळे बाजारावर दबाव येत आहे. पण आता हा घसरलेल्या किमतींच्या दृष्टिकोनातून कंसोलिडेशनचा शेवटचा टप्पा असल्याचे शेअर बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाजारातील काही पॉकेट्सचे व्हॅल्युएशन (Valuation) योग्य पातळीवर पोहोचले आहे. तरीही, एकूण बाजार अजूनही थोडा महाग आहे. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये (Short term)बाजारपेठेत दबाव निर्माण होऊ शकतो. लाँग टर्म (Long term) गुंतवणूकदारांनी चांगल्या दर्जाच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे नायर म्हणाले.

Share Market
यावर्षी 'या' मल्टीबॅगर शेअरने दिला 188 टक्के परतावा!
Share Market
Share Marketsakal media

तांत्रिक दृष्टीकोन (Technical approach)

निफ्टीने (Nifty)डेली स्केलवर बेअरिश कँडल (Bearish Candle)तयार केली आहे आणि गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांपासून तो कमी तोटा करत आहे. म्हणजेच लोअर लोज बनवत आहे असे मोतीलाल ओसवाल फायनान्सचे चंदन तापडिया म्हणाले. जर निफ्टी 16,800 च्या खाली घसरला तर तो 16,400 आणि नंतर 16,200 झोन वर जाताना दिसेल. वरच्या बाजूस, यासाठी 1,7000 च्या झोनमध्ये रझिस्टेंस असल्याचेही ते म्हणाले. निफ्टी (Nifty) 16,200 किंवा 200 दिवसांच्या SMA कडे वाटचाल करत आहे, असे GEPL कॅपिटलचे करण पै म्हणाले. या पातळीच्याही खाली घसरल्यास तो 15,800 च्या दिशेने जाऊ शकतो. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 17,000 च्या स्तरावर रझिस्टेंस दिसून येतो आहे असेही ते म्हणाले.

Share Market
केवळ 29 रुपयांचा स्टॉक देईल भरघोस परतावा! कोणता आहे ते पाहुयात
Share Market
Share MarketSakal

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- भारत पेट्रोलियम (BPCL)

- टाटा मोटर्स (TATAMOTORS)

- टाटा स्टील (TATASTEEL)

- इंडस इंड बँक (INDUSINDBANK)

- बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)

- ए यू बँक (AUBANK)

- एल. अँड टी. टेक्नोलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

- ॲस्ट्रल (ASTRAL)

- आरती इंडस्ट्रीज (AARTIIND)

- माईंड ट्री (MINDTREE)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.