या 3 शेअर्सबाबत तज्ज्ञांना विश्वास, येत्या काळात मिळेल दमदार रिटर्न

आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी 3 शेअर्सबाबत विश्वास व्यक्त केला आहे.
Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market Latest Updates | Stock Market NewsSakal
Updated on

Best Stock to Buy: आरबीआयच्या आर्थिक धोरणापूर्वी भारतीय शेअर बाजारात चांगले वातावरण आहे. RBI ने रेपो दरात 0.50% वाढ केली आहे. आता रेपो रेट 4.90% झाला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही घोषणा केली. तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी आता पैसे गुंतवणे एक चांगली संधी आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी 3 शेअर्सबाबत विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी टाटा स्टील (Tata Steel) आणि गेलवर (Gail) चांगला परतावा मिळण्याची खात्री व्यक्त केली आहे.

शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन यांनी 3 दमदार शेअर्सची निवड केली आहे. ज्यामध्ये त्यांनी टाटा स्टीलमध्ये (Tata Steel) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. निप्पॉन स्टील (Nippon Steel) आणि जपानमधील सर्व कंपन्यांनी किमती वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही टाटा स्टीलमध्ये पैसे गुंतवलेत तर ते फायदेशीर ठरेल.

Share Market Latest Updates | Stock Market News
तज्ज्ञांचा आवडता स्टॉक देईल मजबूत परतावा...

टाटा स्टील (Tata Steel)-
सीएमपी (CMP) - 1033.10 रुपये
टारगेट (Target) - 1075 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 1011 रुपये

याशिवाय लाल पॅथ लॅबमध्ये (Lal Path Lab) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या यावर 60 रुपयांची सूट आहे आणि 6 रुपये डिव्हिडेंड आहे.
Dr Lal Path Fut-
सीएमपी (CMP) - 2022.45 रुपये
टारगेट (Target) - 2140/2150 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 1980 रुपये

Share Market Latest Updates | Stock Market News
50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांना विश्वास...

तिसरा शेअर हा IEX चा निवडला आहे. IEX चा ग्रीन बिझनेस जोरदार कामगिरी करत आहे. मोनोपॉली व्यवसायात ते चांगले काम करत आहे.
IEX Fut-
सीएमपी (CMP) - 176.25 रुपये
टारगेट (Target) - 187/188 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 171 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.