बाजार तज्ज्ञ एनर्जी सेक्टरबाबत सध्या अतिशय सकारात्मक आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा गती आल्याचे दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशातच देशात ऊर्जेची मागणी वाढणार आहे. कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचा देशाच्या ऊर्जा उत्पादनात सर्वाधिक वाटा आहे.
अशा स्थितीत देशातील ऊर्जेची मागणी वाढल्याने कोळशाची मागणीही वाढेल, याचा फायदा कोल इंडियालाही होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (share market expert said buy coal india shares is best for investment)
देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस शेअरखान कोल इंडियाबाबत (Coal India) सकारात्मक दिसत आहे. शेअर खान यांनी 08 सप्टेंबर 2022 ला जारी केलेल्या संशोधन अहवालात कोल इंडियाला बाय रेटिंग दिले आहे. ई-लिलाव प्रीमियम नोटिफाइड कोळशाच्या किमतीपेक्षा 290 टक्के जास्त आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कोळशाच्या किमती आणि सिंगल ई-लिलाव विंडो यामुळे आर्थिक वर्ष 2023 मध्ये ई-लिलाव प्रीमियम उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. अशातच कोल इंडियाचे उत्पादन आणि मागणी जास्त आहे.
हायर कोल ऑफटेक आणि ई-ऑक्शन प्रीमियम लक्षात घेऊन, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या कमाईचा अंदाज वाढवण्यात आला आहे. कोल इंडिया खर्च कमी करण्यावर भर देत आहे. यामुळे कंपनीचा नफा आणि मार्जिन आणखी सुधारेल. त्यामुळेच शेअरखानने कोल इंडियाला (Coal India) बाय रेटिंग दिले आहे आणि त्यासाठी 280 रुपयांचे लक्ष्य दिले आहे.
शुक्रवारी कोल इंडियाचे शेअर एनएसईवर 1.15 अर्थात 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 237.60 रुपयांवर बंद झाला. स्टॉकचा इंट्राडे उच्चांक 237.95 रुपये होता तर इंट्राडे लो 233.55 रुपये होता. स्टॉकचे सध्याची वॉल्यूम 164,707 शेअर्स आहे.
08 सप्टेंबर 2022 ला स्टॉकने 241.85 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला तर 20 डिसेंबर 2021 ला स्टॉकने 139.20 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. सध्या हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 3.04 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 144,515.98 कोटी रुपये आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.