निफ्टी 9 हजार 900 अंशांच्या खाली
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सकाळच्या सत्रात बाजार खुला होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 300 अंशांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 9 हजार 900 अंशांच्या खाली गेला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिवसअखेर सेन्सेक्स 552 अंशांच्या घसरणीसह 33 हजार 228 पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 159 अंशांची घसरण झाली. तो 9 हजार 813 अंशांवर स्थिरावला.
जागतिक पातळीवर चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी जागतिक पातळीवर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे.
सेन्सेक्सच्या मंचावर टेक महिंद्रा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, मारुती, बजाज फायनान्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. सोमवारी झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांना सुमारे एक लाख कोटींचा फटका बसला आहे.
चालू आठवड्यात शेअर बाजारातील आघाडीच्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल जाहीर होणार आहेत. परिणामी गुंतवणूकदारांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
भारतीय बाजारात ओतले 22, 840 कोटी
परदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) 1 ते 12 जून या कालावधीत देशांतर्गत शेअर बाजारांत 22 हजार 840 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. .
जागतिक बाजार
चीनमध्ये नव्याने रुग्ण सापडल्याने त्याचे पडसाद आशियातील शेअर बाजारांवर उमटले. शांघाय, निक्केई आदी शेअर बाजारात घसरण झाली.
कच्चे तेल घटले
जागतिक बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत 2 टक्के घसरण झाली. तेलाचा भाव प्रती बॅरल 35.45 डॉलरपर्यंत खाली आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.