HDFC सिक्युरिटीजचा 'Alicon Castalloy'च्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला!

एचडीएफसी सिक्युरिटीजने पुढील 6 महिन्यांत हा स्टॉक 20 टक्क्यांनी वाढून 995 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे.
Smallcap Stock
Smallcap Stocksakal
Updated on
Summary

एचडीएफसी सिक्युरिटीजने पुढील 6 महिन्यांत हा स्टॉक 20 टक्क्यांनी वाढून 995 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे.

ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Securities) ॲलिकॉन कॅस्टलॉयच्या (Alicon Castalloy) शेअर्सबाबत प्रचंड आशादायी आहे, त्यांनी यासाठी 995 रुपये टारगेट (Target) दिले आहे. सध्या हा स्टॉक (Stock) 823 रुपयांच्या आसपास आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे मत आहे की पुढील 6 महिन्यांत हा स्टॉक 20 टक्क्यांनी वाढून 995 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

Smallcap Stock
'HDFC'चा ग्राहकांना अलर्ट मेसेज! 1 जानेवारीपासून बदलणार 'हा' नियम

आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत ॲलिकॉन कॅस्टलॉयचे (Alicon Castalloy ) निकाल चांगले आले आहेत, असे एचडीएफसी सिक्युरिटीजने आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. या कालावधीत, कंपनीच्या उत्पन्नात वार्षिक आधारावर 30.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ती 268 कोटी रुपये झाली आहे. ऑटो मोबाईल (Automobile) विक्रीत वाढ झाल्याचा फायदा कंपनीला झाला आहे. याशिवाय कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेऊन कंपनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्यात यशस्वी ठरली आहे. कंपनीच्या महसुलात निर्यातीचा वाटा 25 टक्के आहे, तर ऑटो डिव्हिजनचा (Auto Division) वाटा 94 टक्के आहे.

Smallcap Stock
HDFC चे सावधगिरीचे आवाहन; फसवणुकीविरोधात मूह बंद रखो मोहीम

कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे कंपनीच्या एबिटडा (EBITDA) आणि एबिटडा मार्जिनवर (Ebitda margin) महागाईचा परिणाम दिसून आला. कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 7 टक्क्यांनी घसरून 24 कोटींवर आला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 3 कोटी रुपये होता, तर या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला 4 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सेमीकंडक्टरच्या पुरवठ्याशी संबंधित समस्या कमी होत असल्याचे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या तिमाहीत उत्पादनात वाढ होणार आहे. ज्याचा कंपनीला फायदा होईल. याशिवाय सरकारकडून ईव्ही वाहनांना प्रोत्साहन देण्याचाही फायदा कंपनीला मिळणार आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.