Share Market: पेटीएमच्या शेअर्समध्ये गेल्या दोन ट्रेडिंग सत्रात 16 टक्के वाढ

गेल्या दोन दिवसांत पेटीएमचे शेअर्स 617 रुपयांवरून 709 रुपयांपर्यंत वाढले होते.
Share Market
Share Marketsakal media
Updated on

Share Market, Best Stock to Buy: गेल्या अनेक दिवसांच्या घसरणीनंतर अखेर पेटीएमच्या शेअर्समध्ये वाढ दिसायला लागली आहे. पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे, तेव्हापासून शेअर्समध्ये ताकद दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीचे शेअर्स स्थिरपणे व्यवहार करत आहेत. फक्त दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये, पेटीएमचे शेअर्स 16% वर चढले आहेत. मंगळवारी कंपनीचे शेअर्स 709 रुपयांवर पोहोचले.

गेल्या दोन दिवसांत पेटीएमचे (PayTM) शेअर्स 617 रुपयांवरून 709 रुपयांपर्यंत वाढले होते. पेटीएम शेअर्सची नवीन ब्रेकआउट लेव्हल 620 रुपये आहे. गेल्या आठवड्यात, 6 एप्रिलला विजय शेखर शर्मा यांनी आयपीओच्या लिस्टींगनंतर शेअर्सची घसरण का सुरू राहिली हे स्पष्ट केले होते. बाजारातील अस्थिरतेमुळे पेटीएमच्या शेअर्सची विक्री झाली. नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीचे शेअर्स 2150 रुपयांवर लिस्ट झाले होते. मात्र, तेव्हापासून पेटीएमचे शेअर्स 60 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

Share Market
यावर्षी आतापर्यंत 60 टक्के वाढला हा शेअर, तुमच्याकडे आहे का?

यावर्षी आतापर्यंत 60 टक्के वाढला हा शेअर, तुमच्याकडे आहे का?तेजीचे कारण काय?

पेटीएमचे शेअर्स वाढण्यामागे कोणतेही फंडामेंटल कारण नसल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खालच्या स्तरावरून बाउन्स बॅक झाल्यानंतरच पेटीएमच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले पाहिजेत असे त्यांचे म्हणणे आहे.

पेटीएमचे शेअर्सने 620 रुपयांची पातळी ओलांडली आहे आणि 700 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत. त्याचा नवीन ब्रेकआउट 750 रुपये आहे. जर कंपनीचे शेअर्स 645 रुपयांच्या वर ट्रेडिंग करण्यात यशस्वी झाले तर पुढील तीन-चार सत्रात ते 750 रुपयांची पातळी गाठू शकतात. लाँग टर्ममध्ये, जर पेटीएमने 750 रुपयांची पातळी ओलांडली तर ती 900 रुपयांपर्यंत जाऊ शकते. पण शॉर्ट टर्ममध्ये त्याला 645 रुपयांवर सपोर्ट आहे.

Share Market
फार्मा सेक्टरचा हा शेअर तुमच्याकडे आहे का?

तुमच्याकडे पेटीएमचे शेअर्स असतील आणि तुम्ही अजून बाहेर पडू शकला नसाल तर कंपनीच्या निकालाची वाट पहा. चांगले निकाल आले तर शेअर्स वाढू शकतात असे तज्ज्ञ सांगत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.