टाटा स्टीलच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांची दिवाळी! वर्षभरात पैसे डबल

टाटा स्टीलचा 1 वर्षातील परतावा सुमारे 170 टक्के इतका जबरदस्त आहे.
 tata steel
tata steelesakal
Updated on
Summary

टाटा स्टीलचा 1 वर्षातील परतावा सुमारे 170 टक्के इतका जबरदस्त आहे.

मेटल स्टॉक स्टील टाटा गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यावर्षी आतापर्यंत टाटा समूहाच्या या शेअरने 100 टक्के परतावा दिला आहे. टाटा स्टीलचा 1 वर्षातील परतावा सुमारे 170 टक्के इतका जबरदस्त आहे.

टाटा समूहाच्या मेटल स्टॉक टाटा स्टीलमध्ये मिक्स्ड ट्रेंड दिसून येत आहे. इंट्राडेमध्ये शेअर्स 1340 रुपयांपर्यंत मजबूत झाला आणि मग घसरुन 1277 रुपयांवर पोहोचला. टाटा स्टीलने गुरुवारी सप्टेंबर तिमाहीसाठी आपले तिमाही सादर केले आहेत. कंपनीचा नफा 7.5 पट वाढून 12747.70 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तिमाही निकालानंतर, विशाल ब्रोकरेज हाऊस या स्टॉकबद्दल बुलिश अर्थात तेजी पाहत आहे. ब्रोकरेज हाऊस सीएलएसए आणि ब्रोकरेज हाऊस मॅकक्वेरी यांनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे.

 tata steel
Share Market : शेअर बाजारावर मंदिचे सावट!

किती परतावा मिळू शकतो ?

ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने टाटा स्टीलचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे आणि त्यासाठी 1950 रुपयांचे टारगेट दिले आहे. शेअरची सध्याची किंमत सुमारे 1280 रुपये आहे. म्हणजेच हे शेअर्स 50 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. कंपनीने आपले कर्ज कमी केल्याचे ब्रोकरेज हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे. युरोपच्या बाजारपेठेत कंपनीची कामगिरी अत्यंत चांगली झाली. एशियन स्टील प्राइस रेंजबाउंड राहण्याचा अंदाज आहे, पण भारत आणि युरोपमधील पोलादाच्या किंमती वाढू शकतात. यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत EBITDA अंदाजापेक्षा कमजोर आहे. ब्रोकरेज हाऊस मॅकक्वेरीने या शेअरला आउटपरफॉर्मचे रेटींग दिले आहे आणि टारगेट 1870 रुपयांपर्यंत वाढवले आहे.

यावर्षी गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट

टाटा स्टीलच्या शेअर्सने यावर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आतापर्यंत त्यांनी 100 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान, शेअरची किंमत 643 रुपयांवरून 1300 रुपयांवर पोहोचली आहे. या शेअरमध्ये 1 वर्षांचा परतावा 170 टक्के आहे. मागच्या 5 वर्षांत टाटा स्टीलने जवळपास 250 टक्के परतावा दिला आहे.

 tata steel
Veranda Learning कडून 200 कोटींच्या IPO साठी सेबीकडे कागदपत्रे सादर

या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत 7.5 पट नफा

सप्टेंबर तिमाहीत टाटा स्टीलच्या नफ्यात सुमारे 7.5 पटीने वाढ झाली आहे. या काळात कंपनीला 12747.70 कोटी रुपयांचा नफा झाला. तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा नफा 1665 कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 60,554 कोटी रुपयांच्या जवळपास वाढले, जे वर्षभरापूर्वी याच तिमाहीत 39,158 कोटी रुपयांच्या जवळपास होते. मात्र, कंपनीचा एकूण खर्च वाढून 47,135.28 कोटी रुपये झाला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()