आयटी, ऑटो आणि एफएमसीजी शेअर्सना सर्वाधिक फटका बसला.
मंगळवारच्या तेजीनंतर बुधवारी मार्केट पुन्हा घसरले. सेन्सेक्स सुमारे 325 अंकांनी आणि निफ्टी सुमारे 90 अंकांनी घसरला. आयटी, ऑटो आणि एफएमसीजी शेअर्सना सर्वाधिक फटका बसला. मात्र, निफ्टी बँकेत खरेदीचा कल दिसून आला. सेन्सेक्स 323 अंकांनी घसरून 58,341 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 88 अंकांनी घसरून 17,415 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 169 अंकांनी वाढून 37,442 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 122 अंकांनी घसरून 30,743 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स घसरले. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 पैकी 33 शेअर्सची विक्री झाली. तर निफ्टी बँकेच्या 12 पैकी 8 शेअर्सची खरेदी झाली. दुसरीकडे, रुपया 2 पैशांनी मजबूत झाला आणि डॉलरच्या तुलनेत 74.40 वर बंद झाला.
तांत्रिक दृष्टीकोन
निफ्टीने डेली स्केलवर बियरिश कँडल तयार केली. पण त्याने त्याच्या 5 ट्रेडिंग सत्रांच्या लोअर हाईज-लोअर लो फार्मेशनला नकारले. जर निफ्टी 17,500 च्या खाली राहिला तर आपल्याला त्यात 17,350 आणि 17200 पर्यंत कमजोरी दिसू शकते असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. वरच्या बाजूला, यासाठी, 17600 आणि 17777 च्या स्तरावर रझिस्टंस दिसून येईल असेही ते म्हणाले.
आज बाजारात कशी स्थिती असेल ?
निफ्टी डेली चार्टवर वरच्या पातळीवर टिकू शकलेला नाही असे चॉईस ब्रोकिंगचे सचिन गुप्ता म्हणाले. हेड आणि शोल्डर पॅटर्नच्या नेक लाईनला स्पर्श करून खाली आला, याचा अर्थ येत्या सत्रांमध्ये कमजोरीचे संकेत आहेत. तर निफ्टीने लोअर बॉलिंजर बॅड फॉर्मेशनवर चांगला सपोर्ट घेतला आणि 17200 च्या स्तरावरून चांगला पुलबॅक दिसला. आता नजीकच्या काळात, 17200 ची पातळी तातडीचा सपोर्ट दिसत आहे. तर 17650 वर रझिस्टंस दिसू शकतो. दुसरीकडे, बँक निफ्टीला 36650 वर सपोर्ट आहे तर 38000 वर रझिस्टंस दिसत आहे असेही सचिन गुप्ता म्हणाले.
तांत्रिक बाजूचा विचार केल्यास निफ्टीला 17300 वर सपोर्ट आहे तर 17630 वर रझिस्टंस दिसत असल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. बँक निफ्टीला 36800 वर सपोर्ट दिसतो तर 37600 वर रेझिस्टन्स दिसत असल्याचे निगम म्हणाले.
आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?
- आयशर मोटर्स (EICHERMOT)
- टाटा ग्लोबल बेव्हरेजेस (TATACONSUM)
- मारुती (MARUTI )
- ग्रासिम इंडस्ट्रीज (GRASIM)
- इन्फोसिस (INFY)
- माईंड ट्री (MINDTREE)
- आयआरसीटीसी (IRCTC)
- एसआरएफ (SRF)
- एल अँड टी टेक्नोलॉजी सर्विसेस लिमिटेड (LTTS)
- हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.