कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे बाजारात चिंता वाढली आहे. मोठ्या उलथापालथीत गुरुवारी बाजार घसरणीवर बंद झाला. हेवीवेट्सप्रमाणेच छोट्या-मध्यम शेअर्समध्येही विक्री झाली. रिऍल्टी, ऑटो, पीएसई आणि मेटल शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून आला. ऊर्जा, इन्फ्रा आणि एफएमसीजी शेअर्समध्येही विक्री झाली आहे.
आयटी शेअर्समध्येही थोडीशी वाढ झाली आहे. सेन्सेक्स 241 अंकांनी घसरला आणि 60826 च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 72 अंकांनी घसरून 18127 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी बँक 209 अंकांनी घसरून 42409 स्तरावर बंद झाला आहे.
हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
चीन आणि जपानमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे बाजारावर परिणाम झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी बाजारात कमजोरी दिसून आली. मेटल, ऑटो आणि रियल्टी शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली. पण, इतर युरोपीय आणि आशियाई बाजार तेजीत राहिले. भारतीय शेअर बाजाराचे मूल्यांकन खूप जास्त असल्याचे हे द्योतक आहे.
तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टी त्याच्या 50 दिवसांच्या एसएमएजवळ व्यवहार करत आहे. पण त्याचा इंट्राडे ट्रेंड सध्याच्या स्तरांवरून पुलबॅक रॅली सुचवतो. निफ्टीला आता 18050 वर सपोर्ट दिसत आहे.
जर निफ्टी या पातळीच्या वर राहिला तर त्यात 18300-18350 पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 18050 च्या खाली घसरला तर अधिक दबाव वाढताना दिसेल. मग त्यात17950 आणि 17930 च्या दिशेने वाटचाल पाहू शकतो.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड (SHRIRAMFIN)
ट्रेंट (TRENT)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
भारत फोर्ज (BHARATFORG)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.