शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात ‘या’ घटकांवर ट्रेडर्सचं लक्ष

Share Market
Share MarketSakal
Updated on
Summary

मागचा आठवडा शेअर बाजारासाठी विक्रमी होता. बेंचमार्क निर्देशांकाने (Benchmark Index) नवीन उच्चांक गाठले.

शिल्पा गुजर- मागच्या आठवड्यात शेअर बाजारात झपाट्याने वाढ झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात कंसॉलिडेशन होण्याचा अंदाज आहे. मागचा आठवडा शेअर बाजारासाठी विक्रमी होता. बेंचमार्क निर्देशांकाने (Benchmark Index) नवीन उच्चांक गाठले. तंत्रज्ञान, भांडवली वस्तू (Capital Gains), ऊर्जा (Energy) आणि निवडक ऑटोमोबाईल स्टॉक्समधील चांगल्या तेजीमुळे बीएसई सेन्सेक्सने 60,000 अंकांचा टप्पा ओलांडला आणि तो राखण्यात यश मिळवले. यामागे चीनच्या एव्हरग्रांडच्या (Evergrande) डिफॉल्टच्या जोखमीत घट, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा निकाल, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून खरेदी ही प्रमुख कारणे राहिली.

पुढच्या आठवड्यात हे घटक शेअर बाजारासाठी महत्त्वाचे असू शकतात:- कोरोना व्हायरस आणि लसीकरणदेशभरात लसीकरणाचा वेग वाढत असताना, त्याच्या संसर्गात गेल्या आठवड्यापेक्षा 35,000 पेक्षा कमी झाली होती. सकारात्मकतेचा दरही 2 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि आंध्र प्रदेशात कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत.आतापर्यंत 84 कोटीहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. यामुळे देशातील सुमारे 46 टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस मिळाला असून 16 टक्के लोकसंख्येला दोन्ही लस देण्यात आल्या आहेत.

- मल्टिप्लेक्स आणि रिअल इस्टेट स्टॉकवर लक्ष ठेवामहाराष्ट्र सरकारने 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आणि सभागृहे (Auditorium) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मल्टिप्लेक्स चेन ऑपरेटर्सना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्स सारख्या स्टॉक्समध्ये खरेदी वाढू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.

Share Market
स्मार्ट माहिती : ऑटो डेबिट सुविधेत काय होणार बदल?

रिअल इस्टेट स्टॉक्समध्ये या आठवड्यात चांगली खरेदी झाली. ओबेरॉय रिअल्टी, डीएलएफ आणि महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्सने विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला. पुढच्या आठवड्यातही या क्षेत्राला वेग येण्याची शक्यता आहे.

आयपीओ (IPO)आदित्य बिर्ला एएमसीचा आयपीओ 29 सप्टेंबरला खुला होईल. यासाठीचा प्राईस बँड 695-712 प्रति इक्विटी शेअर असणार आहे. आदित्य बिर्ला कॅपिटल आणि सन लाइफ एएमसी यांचा कंपनीत हिस्सा आहे. आयपीओमध्ये दोन्ही भागधारकांकडून विक्रीसाठी ऑफर असेल. ते 3,88,80,000 इक्विटी शेअर्स विकतील.

लिस्टिंगपारस डिफेन्स पुढच्या आठवड्यात लिस्ट होणार आहे. हा इश्यू 304 पट सबस्क्राइब करण्यात आला होता. याची इश्यू प्राइस प्रति शेअर 175 रुपये असण्याचा अंदाज आहे. कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 405-425 रुपयांना व्यापार (Trade) करत आहे.

ऑटोमोबाईल विक्रीसप्टेंबरमधील वाहन विक्रीची आकडेवारी 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल. यावर बाजाराचे लक्ष असेल. चिपच्या कमतरतेमुळे विक्रीवर परिणाम होऊ शकतो असा विश्वास तज्ज्ञांना आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर मोटर्स, बजाज ऑटो, अशोक लेलँड, हिरो मोटोकॉर्प आणि एस्कॉर्ट्स यांच्या शेअर्सवर जास्त भर असेल.या आर्थिक वर्षात ऑटोमोबाईल स्टॉक खूपच कमकुवत झाले आहेत.

Share Market
स्मार्ट गुंतवणूक : ‘बुस्टर एसटीपी’तून संपत्तीनिर्माण

एफआयआय आणि डीआयआय (FII and DII)परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (FII) अनुपस्थितीत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) या आठवड्यात शेअर बाजारात बरीच खरेदी केली आणि तेजीमध्ये महत्त्वाची भूमिका राहिली. पुढच्या आठवड्यात एफआयआय आणि डीआयआय या दोघाच्या 'फ्लो'वर लक्ष असेल. मात्र, एफआयआयकडून विक्री जास्त असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तांत्रिक दृष्टीकोनडेली चार्ट्सवर टेकनिकल बाजू पाहिली तर निफ्टी 50 ने लहान बियरिश कँडल्स तयार केल्या आहेत, जो स्पिनिंग टॉपचा पॅटर्न दाखवतो. मागच्या आठवड्यातली तेजी लक्षात घेता बाजारात काही कंसॉलिडेशन होऊ शकते. यासाठी 17,600 गुणांवर सपोर्ट आणि रेझिस्ट्ंस 18,000 अंकांवर आहे.

Share Market
अर्थभान : समतोल गुंतवणुकीचे तंत्र

टेकनिकल बाजू पाहिल्यास लक्ष येते की निफ्टीने मागील आठवड्यात लाँग बुलिश कँडलचे पॅटर्न केले आहे. यात मिडियन टर्ममध्ये जेती आणि शॉर्ट टर्म अर्थात अल्पावधीत काही घसरणीचे संकेत मिळत आहेत अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे (HDFC Securities) तांत्रिक संशोधन विश्लेषक नागराज यांनी दिली.

एफ अँड ओकडून (F&O) संकेतनिफ्टी पुढच्या आठवड्यात 17,500-18,000 च्या रेंजमध्ये असल्याचा अंदाज “ऑप्शन डेटा”मधून मिळत आहे. मॅक्झिमम कॉल ओपन इंटरेस्ट 18,500 आणि यानंतर 18,000 आणि 17,900 स्ट्राइक्सवर दिसत आहेत. मॅक्झिमम पुट ओपन इंटरेस्ट 17,000 आणि यानंतर 17,500 आणि 17,700 आणि 17,800 स्ट्राइक्सवर दिसत आहेत.
18,000 वर कॉल बेस शॉर्ट टर्मवर अडथळा ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Share Market
शेअर मार्केट : ‘सेन्सेक्स’ची साठी : ‘अभी तो मैं जवान हूँ’

इकॉनॉमिक डेटा
पुढच्या आठवड्यात वित्तीय तूट (fiscal deficit) आणि पायाभूत सुविधांचे उत्पादन (Infrastucture Output) आणि पहिल्या तिमाहीतील चालू खात्याची आकडेवारी केली जाईल. सप्टेंबरसाठी बाजार उत्पादन पीएमआय आणि 24 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन राखीवबाबत (Foriegn Exchange Reserve) माहिती मिळेल.

जागतिक डेटा (Global Data)
पुढच्या आठवड्यात जगभरातील शेअर बाजारांची नजर चीनच्या एव्हरग्रांड ग्रुपवर (Evergrande Group) असेल. त्याच्या रोख्यांवरील (Bond) आणखी एक व्याज देयक (Interest Payment) बुधवारी होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस रोख्यांवर (Bond) आणखी काही देयके (Payment) करावी लागणार आहे. त्यांच्या डिफॉल्टच्या परिस्थितीत शेअर बाजारांनाही त्यांच्या धक्का बसू शकतो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.