आठवड्याच्या प्रारंभीस शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घट

निफ्टी ६०.६० अंकांनी म्हणजेच ०.३७ टक्क्यांनी घसरला व १६,१६०.१० अंकांवर स्थिर झाला.
Todays Share Market News
Todays Share Market Newsgoogle
Updated on

Todays Share Market News : आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स २२०.५३ अंकांनी म्हणजेच ०.४० टक्क्यांनी घसरला व ५४,२६१.३१ अंकांवर स्थिर होत बाजार सुरू झाला. निफ्टी ६०.६० अंकांनी म्हणजेच ०.३७ टक्क्यांनी घसरला व १६,१६०.१० अंकांवर स्थिर झाला. (Todays Stock Market Updates)

Todays Share Market News
शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला

गेल्या काही आठवड्यांच्या घसरणीनंतर दोन आठवड्यांपूर्वी बाजार हिरव्या रंगात बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. यात ऑटो सेक्टरने महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच वस्तूंच्या किंमतीतही सुधारणा झाली आहे. दुसरीकडे, बीएसई मेटल, बीएसई एनर्जी आणि बीएसई ऑइल अँड गॅसने तुलनेने कमकुवत प्रदर्शन केले.

दुसरीकडे, विंडफॉल टॅक्सच्या बातम्यांमुळे एनर्जी शेअर्समध्ये बरीच घसरण दिसली. एनर्जी इंडेक्स जवळपास ४ टक्क्यांनी घसरला. सर्वात जास्त दबाव पीएसई, मेटल शेअर्सवर होता, त्यानंतर एफएमसीजी, रियल्टी, फार्मा शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून आला. बँकिंग शेअर्समध्ये रिकव्हरी दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.