Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 240 तर निफ्टी 74 अंकांवर

आठवड्याचा पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये तेजी
Share Market Updates
Share Market Updatesesakal
Updated on

आठवड्याचा पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून येत आहे. गेल्या आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात असलेला खरेदीचा जोर आज या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले आहे. सेन्सेक्स 240 अंकांच्या तेजीत असून निफ्टी 74 अंकांवर गेला आहे. सेन्सेक्सने आज पुन्हा एकदा 60,000 अंकांचा टप्पा ओलांडला आहे. तर सेन्सेक्समध्ये आज 0.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,204 अंकांवर सुरू झाला. तर निफ्टीमध्ये 0.68 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,957 अंकांवर सुरू झाला.

शुक्रवारी बाजारात पुन्हा व्होलेटाइल सेशन पाहायला मिळाले. मात्र तरीही बाजार हिरव्या रंगात बंद झाला. सकारात्मक जागतिक संकेतांनी बाजाराला गती मिळाली पण पण 12 सप्टेंबरला चलनवाढीचा डेटा येण्याच्या शक्यतेमुळे, बाजार वर-खाली होत राहिला.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 104.92 अंकांच्या म्हणजेच 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 59,793.14 वर बंद झाला. निफ्टी 34.60 अंक म्हणजेच 0.19 टक्क्यांनी 17,833.35 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

गेल्या काही आठवड्यांपासून निफ्टी कंसोलिडेशनच्या रेंजमध्ये अडकल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. वरच्या बाजूला, 18000 ची मानसशास्त्रीय पातळी निफ्टीसाठी एक मोठा अडथळा म्हणून काम करत आहे. शुक्रवारच्या व्यवहारात निफ्टी ही पातळी गाठणार होता, जेव्हा पुन्हा एकदा विक्रीचा दबाव आला आणि निफ्टी 18000 च्या जवळ बंद झाला. जोपर्यंत निफ्टी ही पातळी तोडत नाही, तोपर्यंत पुढील काही आठवड्यांत तो कंसोलिडेशन रेंजमध्ये फिरताना दिसेल.

शुक्रवारच्या अस्थिर सत्रात बाजार किंचित वाढीसह बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. मजबूत जागतिक संकेतांमध्‍ये बाजार मजबूत नोटवर उघडला. पण नफावसुलीमुळे नफा मर्यादित राहिला.

नुकत्याच झालेल्या अमेरिकी बाजारातील तेजीने भारतीय बाजारालाही चांगले संकेत दिलेत, त्यामुळे बाजारात खरेदीच्या संधी आहेत. बँकिंग, फायनांशियल, ऑटो आणि एफएमसीजी यासारख्या उत्तम कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांतील चांगल्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे असेही मिश्रा म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()