गेल्या आठवड्याभरापासून शेअर बाजारात अस्थिरता कायम आहे. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केट घसरणीसह बंद झाला. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराकडे सर्वांचे लक्ष आहे. अशात आज शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. आज सेन्सेक्स 233 अंकाच्या घसरणीसह 59,700 वर सुरू झाला तर निफ्टी 96 अंकाच्या घसरणीसह 17,781 वर सुरू झाला.
आज सुरवातीच्या सत्रात केवळ 11 शेअर्स मध्ये तेजी दिसत आहे तर तब्बल 39 शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. विशेषत: आयटी आणि बँकीगचे शेअर्समध्ये मोठी घसरण दिसत आहे. त्यामुळे मार्केटच्या शेवटच्या सत्रापर्यंत गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम राहील.
व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 412.96 अंकांनी म्हणजेच 0.68 टक्क्यांनी घसरून 59934.01 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 131.30 अंकांनी म्हणजेच 0.73 टक्क्यांनी घसरून 17872.45 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
गेल्या आठवड्यात बाजारात चांगली तेजी पाहिल्याचे कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे श्रीकांत चौहान म्हणाले. अशा स्थितीत आता नफा बुक अर्थात प्रॉफिट बुकिंग होणे स्वाभाविक आहे. सेंट्रल बँकांच्या चलनविषयक धोरणाबाबत कठोर भूमिका आणि व्याजदरात वाढ होण्याची शक्यता यामुळे बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.
निफ्टीने डेली चार्टवर बियरिश कँडल तयार केली आहे. याने इंट्राडे चार्टवर डबल डिजिट फॉर्मेशन दिले आहे, जे येत्या काळात बाजारात कमजोरीचे संकेत देत असल्याचे ते म्हणाले. बाजाराचा ट्रेडिंग सेटअप सूचित करतो की 17800 सपोर्ट तोडल्यानंतर विक्रीचा टप्पा येण्याची शक्यता आहे. जर सेन्सेक्स 17800 च्या वर राहिला तर त्यात 18100-18150 ची लेव्हल दिसेल. दुसरीकडे, जर तो 17800 च्या खाली घसरला, तर इंट्राडेमध्ये तीव्र घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि निफ्टी 17700-17650 च्या दिशेने जाताना दिसू शकतो.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
मारुती (MARUTI)
आयशर मोटर्स (EICHERMOTORS)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
पॉवरग्रीड (POWERGRID)
एनटीपीसी (NTPC)
एमआरएफ (MRF)
ॲस्ट्रल (ASTRAL)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBANK)
बाळकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
आयआरसीटीसी (IRCTC)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.