शेअर बाजारात आठवड्याची सुरवात घसरणीसह झाली आहे. सकाळच्या पहिल्या सत्रानंतर सेन्सेक्स निर्देशांक वधारला असल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर मोठी घसरण दिसून आली आहे. शुक्रवारी, अमेरिकन शेअर बाजारामध्ये घसरण दिसून आली होती. त्यामुळे जागतिक शेअर बाजारातही अस्थिरता दिसून आली होती. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 200 अंकांच्या घसरणीसह 57,719 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 74 अंकांच्या घसरणीवर 17,111 अंकांवर व्यवहार करत होता.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
निफ्टीने 17000-16950 च्या सपोर्ट झोनमधून चांगली तेजी घेतल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. तर आवर्ली चार्टवर ट्रायंग्युलर पॅटर्नमधून ब्रेकआउट दिल्याचे दिसून आले आणि डेली मूविंग एव्हरेज पार केली. पण निफ्टीला सुरुवातीचा नफा कायम राखला नाही आणि शेवटच्या ट्रेडिंग तासात विक्री झाल्यामुळे तो घसरला. तर निफ्टी अजूनही कंसोलिडेशनच्या टप्प्यात आहे. निफ्टी पुन्हा एकदा 17050 च्या पातळीवर उतरू शकतो. वरच्या बाजूने, 17350 वर निफ्टीसाठी शॉर्ट टर्म रझिस्टन्स दिसत आहे.
सध्या संपूर्ण जगात महागाईच्या आकड्यांवर लक्ष असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन यांनी सांगितले. यूएस चलनवाढीच्या आकडेवारीनंतर यूएस मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता होती असेही ते म्हणाले.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
इन्फोसिस (INFOSYS)
एचडीएफसी बँक (HDFCBANK)
एचडीएफसी (HDFC)
एचसीएल टेक (HCLTECH)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
लॉरस लॅब (LAURUSLAB)
ए यू बँक (AUBANK)
एल अँड टी सर्व्हिसेज लिमिटेड (LTTS)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.