Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजीला ब्रेक, बाजार घसरणीसह सुरू

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार पहिल्या सत्रात घसरणीसह सुरू झाला.
share market
share marketSakal
Updated on

आठवड्याभरापासून शेअर बाजारात तेजी दिसून आली. गुरुवारीही शेअर बाजारात तेजी कायम होती आणि तेजीसह बाजार बंद झाला. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार पहिल्या सत्रात घसरणीसह सुरू झाला.

सेन्सेक्स 211 अंकाच्या घसरणीसह 63,072 वर सुरू झाला तर निफ्टी 55 अंकाच्या घसरणीसह 18,756 वर सुरू झाला. आज सुरवातीच्या सत्रात 11 शेअर्समध्ये तेजी तर 39 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. (share market update 2 December 2022)

गुरुवारी शेअर बाजार सलग आठव्या दिवशी तेजीत राहिला. बाजाराने डिसेंबर महिन्याची सुरुवात तेजीने केली. सेन्सेक्स-निफ्टीने पुन्हा नवीन उच्चांक गाठला. यूएस फेडच्या कमी व्याजदर वाढीच्या अपेक्षेने बाजारात उत्साह दिसून आला.

गुरुवारी शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 184.54 अंकांनी म्हणजेच 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 63284.19 वर, तर निफ्टी 54.20 अंकांनी किंवा 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 18812.50 वर बंद झाला.

share market
PSQ Stock : या स्टॉकने 3 महिन्यात दुप्पट केली गुंतवणूक

गुरुवारी आयटी, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर एनर्जी, ऑटो आणि एफएमसीजी दबावाखाली राहिले. गुरुवारी हेवीवेट शेअर्सपेक्षा लहान आणि मध्यम शेअर्सनी चांगली कामगिरी केली होती. 

आज आठड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह सुरू झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम आहे. त्यामुळे कोणते शेअर्स वर येतील आणि कोणते शेअर्स खाली येतील, या कडे सर्वांचे लक्ष लागले.

share market
Stock Market : या स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, अडीच वर्षात तिप्पट परतावा...

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)
हिन्दाल्को (HINDALCO)
टाटा स्टील (TATASTEEL)
ग्रासिम (GRASIM)
टीसीएस (TCS)
एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
डिक्सन (DIXON)
व्होल्टास (VOLTAS)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()