Share Market : बाजारात पडझड, 'या' मोठ्या आयटी अन् बँकीग शेअसर्मध्ये मोठी घसरण

आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे.
share market
share marketSakal
Updated on

सोमवारी बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळाली. हेवीवेट तसेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मात्र आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे.

सेन्सेक्स 345 अंकाच्या घसरणीसह 61,461 वर सुरू झाला तर निफ्टी 84 अंकाच्या घसरणीसह 18,335 वर सुरू झाला. आज फक्त 6 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे तर तब्बल 44 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. (share market opening update 20 December 2022 )

सोमवारी सेन्सेक्स 468 अंकांनी वाढून 61806 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 151 अंकांनी वाढून 18420 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 194 अंकांनी वाढून 43,414 वर बंद झाला.

ऑटो, एफएमसीजी आणि मेटल शेअर्स वधारले. इन्फ्रा, एनर्जी आणि पीएसई शेअर्समध्येही वाढ दिसून आली होती पण आयटी आणि पीएसयू बँकिंग शेअर्स दबावाखाली दिसले.

share market
Stock Split : दोन वर्षात 200% रिटर्न, 'या' कंपनीने केली शेअर्स स्टॉक स्प्लिटची घोषणा

आज 'या' शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे

ADANIENT, AXISBANK, SBIN, HEROMOTOCO, BRITANNIA आणि BAJFINANCE या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे

आज 'या' शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे

TCS, ICICIBANK, BAJAJ-AUTO, ADANIPORTS, KOTAKBANK, WIPRO, COALINDIA, CIPLA या आयटी, बँकींग तसेच फार्मा शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

share market
Stock Market : या स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, अडीच वर्षात तिप्पट परतावा...

युरोपीय बाजारातील वाढ आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे भारतीय बाजारांचा मूडही सुधारल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. पण यूएस फेडकडून दरात आणखी वाढ होण्याच्या शक्यतेनंतर गुंतवणूकदार सावध दिसत आहेत.

अशा परिस्थितीत येत्या ट्रेडिंग सत्रात बाजारात आणखी चढ-उतार पाहायला मिळू शकतात. जोपर्यंत व्याजदरांबद्दलची चिंता कमी होत नाही तोपर्यंत निवडकशेअर्समध्येच पैसे गुंतवणे योग्य ठरेल असेही चौहान यांचे म्हणणे आहे.

share market
Share Market : बाजारात घसरण असूनही 'हा' शेअर देतोय धमाकेदार रिटर्न; वाचा काय आहे किंमत

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
पॉवरग्रीड (POWERGRID)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
पेज इंडिया (PAGEIND)
एबीबी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ABB)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.