Share Market Opening : सेन्सेक्स-निफ्टीत पडझड; शेअर बाजार अस्थिर राहण्याचे संकेत

शेअर बाजारात आज किंचित चढ-उताराने सुरुवात
share market
share marketSakal
Updated on

शेअर बाजारात आज किंचित चढ-उताराने सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स 57 अंकांच्या वाढीसह 60805 वर तर निफ्टी 20 अंकांच्या वाढीसह 18121 अंकांवर उघडला. त्याचवेळी बँक निफ्टी 59 अंकांच्या वाढीसह 42642 वर उघडला आहे.

सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 300 हून अधिक अंकांची घसरण पाहायला मिळाली. मात्र, टाटा मोटर्स, टाटा स्टील, पॉवरग्रीड या शेअर्स मध्ये तेजी दिसून येत आहे. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. त्याच वेळी, टीसीएसच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण होताना दिसत आहे.

share market
Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सुरुवातीच्या सत्रात टाटा मोटर्स, टाटा स्टील, एम अँड एम, पॉवरग्रीड, सन फार्मा, टायटन, एचयूएल, एल अँड टी आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये आज तेजीने व्यवहार करत आहेत. याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, विप्रो, रिलायन्स, एचसीएल टेक, एशियन पेंट्स आणि आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

share market
Gold Silver Price : मकर संक्रांतीच्या तोंडावर सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.