Share Market: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; सेन्सेक्स 334 तर निफ्टी 69 अंकांनी वधारला

शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आज गॅपअप ओपनिंग दिलं.
Todays Share Market Updates | Stock Market news
Todays Share Market Updates | Stock Market newsSakal
Updated on

गेल्या चार दिवसांपासूनशेअर बाजारात होत असलेल्या घसरणीला आजच्या दिवसाच्या सुरुवाताली ब्रेक लागला. शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आज गॅपअप ओपनिंग दिलं. सेन्सेक्स आज सुरु होताना 334.37 अंकांच्या वाढीसह 58910 वर सुरु झाला तर निफ्टीही 69.6 अंकांच्या वाढीसह 17599 वर सुरु झाला. (Share Market Opening Updates 13th April 2022, Sensex and Nifty Status Today)

Todays Share Market Updates | Stock Market news
Share Market: पेटीएमच्या शेअर्समध्ये गेल्या दोन ट्रेडिंग सत्रात 16 टक्के वाढ

शेअर बाजार मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. आयटी, मेटल, रियल्टी, ऑइल अँड गॅस आणि कॅपिटल गुड्सने बाजारावर दबाव आणला. दुसरीकडे, बँकिंग शेअर्समधील खरेदीने बाजाराला दिवसाच्या नीचांकातून सावरण्यास मदत झाली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 388.20 अंकांनी म्हणजेच 0.66 टक्क्यांनी घसरून 58,576.37 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 144.65 अंक अर्थात 0.82 टक्क्यांनी घसरून 17,530.30 वर बंद झाला.

Todays Share Market Updates | Stock Market news
Share Market: अडीच महिन्यांनंतर गाठला उच्चांक; SENSEX 60000, NIFTY चा धमाका

बर्‍याच काळानंतर निफ्टी त्याच्या 10-दिवसांच्या SMA खाली बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. ब्रॉडर मार्केटमध्ये अजूनही कमजोरीची चिन्हे आहेत. आता निफ्टीने 17,620 वर ब्रेकआउट दिल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर निफ्टी 17620 च्या खाली घसरला, तर तो 17,400-17,350 च्या दिशेने जाताना पाहू शकतो असेही ते म्हणाले. निफ्टी 17620 च्या वर ट्रेड करताना दिसला तर तो 17,700 आणि 17,800 च्या दिशेने जाताना दिसेल. अशात बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.