Share Market: दोन दिवसाच्या तेजीनंतर शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 142 अंकानी घसरला

आज शेअर बाजारातील शेअर्सच्या चढ उताराकडे सर्वांचे लक्ष असणार
Share Market Updates
Share Market Updatessakal
Updated on

शेअर बाजाराची सुरवात आज घसरणीसह सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसात शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली होती. आज सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा पडली आहे. दिवाळीच्या तोंडावर आज शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे. आज सेन्सेक्स 142 अंकाच्या घसरणीसह 58,951 वर सुरू झाला तर निफ्टी 46 अंकाच्या तेजीसह 17,467 वर सुरू झाला. आज सुरवतीपासून शेअर बाजारात घसरण दिसून आल्यामुळे दिवसभरात शेअर बाजारातील शेअर्सच्या चढ उताराकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

जागतिक बाजार सावध होताच भारतीय निर्देशांक स्थिर वाढीसह बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. गुंतवणूकदार निवडक खरेदीमध्ये गुंतलेले आहेत. निफ्टीने डेली चार्टवर एक बियरिश कँडल तयार केली आहे. पण बाजाराचा शार्ट टर्म टेक्स्चर अजूनही सकारात्मक दिसत आहे.

निफ्टीसाठी 17,400 वर महत्त्वाचा सपोर्ट झोन असेल असे श्रीकांत चौहान म्हणाले. जर निर्देशांक याच्या वर व्यवहार करत असेल तर येत्या काळात तो 17,600-17,700 च्या पातळीवर जाऊ शकतो. दुसरीकडे, 17,400 च्या खाली गेल्याने त्याचा अपट्रेंड कमकुवत होईल.
अस्थिर सत्रात बाजार किरकोळ वाढीने बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकींगचे अजित मिश्रा म्हणाले. सुरुवातीच्या तेजीनंतर निफ्टीमध्ये हळूहळू घसरण दिसून आली. याचे कारण गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बूक करायला प्राधान्य दिले. यामुळे बाजार बंद होताना निफ्टी 17,512 च्या पातळीवर आला. निफ्टीमध्ये काही प्रमाणात स्थिरता येण्याची चिन्हे आहेत, जी त्यासाठी फायदेशीर ठरेल असेही ते म्हणाले.

Share Market Updates
बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

नेसले इंडिया (NESTLEIND)
आयटीसी (ITC)
एचडीएफसी (HDFC)
रिलायन्स (RELIANCE)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
लॉरस लॅब (LAURUSLABS)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
पेज इंडिया (PAGEIND)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.